Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, दिल्लीतील जहांगीरपुरीमधील मुस्लिम समुदायाने एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे.
त्या व्हिडिओत मुस्लिमांची टोपी घालून काही लोकं एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी देतांना दिसत आहे.
सुदर्शन न्यूजच्या पत्रकारांनी व्हायरल व्हिडिओ ट्विट करून त्यात लिहिले,”वर्दी उतरवून मला भेटा…परिस्थिती आता इथवर येऊन पोहोचली आहे…#DelhiRiots #जहांगीरपुरी”
(वरील पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
इथे तुम्ही या ट्विटचे संग्रहण देखील पाहू शकता.
त्यातच फेसबुकवर एका युजरने व्हायरल व्हिडिओ शेअर करत लिहिले,”वर्दी उतरवून मला भेटा. परिस्थिती आता इथवर येऊन पोहोचली आहे.”
(वरील पोस्टचा मराठीत अनुवाद केला आहे)
मागच्या शनिवारी दिल्लीतील जहांगीरपुरीमध्ये हनुमान जयंतीनिमित्त शोभा यात्रा काढली होती. तेव्हा दोन समूहांमध्ये भांडणे झाली. त्यानंतर दोन्ही बाजूने दगडफेक झाली.
बीबीसीच्या एका बातमीनुसार, या घटनेत नऊ लोक जखमी झाले. त्यात आठ पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या घटनेसंबंधित आतापर्यंत २४ लोकांना अटक केली आहे. ज्यात दोन अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.
त्यातच आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, दिल्लीतील जहांगीरपुरीमधील मुस्लिम समुदायाने एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली आहे.
Fact Check / Verification
दिल्लीतील जहांगीरपुरीमधील मुस्लिम समुदायाने एका पोलीस अधिकाऱ्याला धमकी दिली, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही तो व्हिडिओ बारकाईने पाहिला.
तेव्हा आम्हांला त्या पोलीस अधिकाऱ्याच्या हाताच्या बाहीवर एक बॅच दिसला. त्यावर ‘महाराष्ट्र पोलीस’ असे लिहिले होते.
त्यानंतर आम्ही ‘महाराष्ट्र पोलीस धमकी’ असा कीवर्ड टाकून शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्हांला सोपान जाधव नावाच्या एका फेसबुक युजरने २४ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला.
त्या व्हिडिओसोबत लिहिले होते,”चोपडा (जळगांव, महाराष्ट्र) बस स्थानकावरील ही घटना आहे.”
आम्ही बारकाईने पाहिले असता आमच्या लक्षात आले की, सोपान जाधव यांनी अपलोड केलेला व्हिडिओ आणि व्हायरल झालेला व्हिडिओ सारखाच आहे.
या पडताळणीसाठी न्यूजचेकरने महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील चोपडा पोलीस स्थानकात संपर्क साधला. तेव्हा तेथील संदीप राव पाटील यांनी सांगितले,”सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ चोपडा बस स्थानकाचा आहे. व्हिडिओत दिसणारे पोलीस अधिकारी श्रीकांत गांगुर्डे आहे.”
त्यानंतर आम्ही संदीप राव पाटील यांच्या मदतीने श्रीकांत गांगुर्डे यांच्याशी संपर्क साधला. मग त्यांनी सांगितले,”ही घटना सप्टेंबर २०१८ ची आहे, ज्यावेळी मी जळगांवमधील चोपडामध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून रुजू झालो होतो. मी तेव्हा चोपडा बस स्थानकावर उभा होतो. तिथे एका व्यक्तीने गाडी लावली. त्यामुळे इतर व्यक्तींना त्याची अडचण होऊ लागली.”
पुढे बोलतांना त्यांनी सांगितले,”मी त्या व्यक्तीला तेथून गाडी काढण्यास सांगितली. पण त्याने ऐकले नाही. मग आमच्यात वादविवाद झाले. तेव्हा चार लोकांवर आयपीसीच्या ३५३ कलमानुसार केस दाखल केली. पण वर्षभरापूर्वी त्यातील दोन व्यक्तींचा मृत्यू झाला. व्हिडिओत मला धमकी देणारे ते दोन व्यक्ती हेच आहेत.”
तुम्ही ही संपूर्ण घटना ‘मिया भाई की डेरिंग’ या युट्यूब वाहिनीवर पाहू शकता, असे देखील त्यांनी सांगितले.
त्यानंतर आम्ही युट्यूबवर ‘मिया भाई की डेरिंग’ असं सर्च केले. आम्हाला आर्यन किंग नावाच्या युट्यूब वाहिनीवर ७ ऑक्टोबर २०१८ रोजी अपलोड केलेला एक व्हिडिओ मिळाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओचा काही भाग या व्हिडिओत आपल्याला पाहायला मिळेल.
हे देखील वाचू शकता : सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते ? चुकीची माहिती व्हायरल
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, दिल्लीतील जहांगीरपुरीमधील सांगितला जाणारा व्हिडिओ मुळात तिथला नसून महाराष्ट्रातील जळगांव जिल्ह्यातील आहे. हा व्हिडिओ जवळपास तीन वर्षांपूर्वीचा आहे.
Result : False Context/False
Our Sources
२४ सप्टेंबर २०१८ रोजी अपलोड केलेली सोपान जाधव यांची फेसबुक पोस्ट
फोनवरून श्रीकांत गांगुर्डे यांच्याशी झालेला संवाद
आर्यन किंग यांनी ७ ऑक्टोबर २०१८ रोजी अपलोड केलेली युट्यूब व्हिडिओ
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
January 29, 2025
Prasad S Prabhu
December 23, 2024
Komal Singh
December 20, 2024