या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. महिलांनी मासिक पाळीच्या आधी पाच व नंतर पाच दिवस कोरोना लस घेऊ नये असा मेसेज व्हायरल झाला. शिवाय राज्य सरकराने आॅक्सिजन प्लांटसाठीचा पैसा गायब केल्याची पोस्ट देखील शेअर होत आहे. तसेच दीक्षाभूमी समिती ने आॅक्सिजन प्लांटसाठी 120 कोटी रुपये दान केल्याचा दावा देखील व्हायरल होत आहे.
याशिवाय इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये? हे आहे व्हायरल मेसेजचे सत्य
मासिक पाळीदरम्यान महिलांनी कोरोना लस घेऊ नये असा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून देशभरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.मात्र याच दरम्यान हा मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पण हा या मेसेजमधील दावा खरा नाही. मासिक पाळीत लसीचा काही धोका नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

राज्य सरकारने आॅक्सिजन प्लान्टचा निधी गायब केला?
ज्य सरकारने पीएम केअर फंडामधून महाराष्ट्राला १० ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी निधी गायब केला केल्याचा दावा भाजपा आमदारासह अनेक यूजर्सनी केला आहे. यात म्हटले आहे की, राज्य सरकारने गेल्या ४ महिन्यांमध्ये एकही प्लांट उभारला नाही. हे पैसे राज्य सरकारने गायब केले आहेत. पण हे सत्य नाही केंद्राने राज्य सरकारला थेट पैसे दिलेले नाहीत. तर एजेंसी ला दिले आहेत. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

दीक्षाभूमी समितीकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटींचे दान?
नागपुरच्या दीक्षाभूमी समितीकडून ऑक्सिजन प्लांट निर्मितीसाठी 120 कोटी रुपयांचे दान सरकारला देण्यात आल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, ऑक्सिजन प्लांट निर्मिती साठी दीक्षाभूमी येथून सरकार ला 120कोटी च दान. दीक्षाभूमी समिती चे खूप खूप आभार. पण हे सत्य नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा

बीएमसीने लाॅकडाऊनची नवी नियमावली जारी केलेली नाही, खोटी पोस्ट व्हायरल
बीएमसीने लाॅकडाऊनची नवी नियमावली जारी केल्याची पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. रुग्णांची संख्या वाढतच राहिल्याने 15 में पर्यंत लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. याच दरम्यान बीएमसीच्या नव्या नियमावलीची यादी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पण हे सत्य नाही. बीएमसीने नवीन नियमावली तयार केेलेली नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.