Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकाकडून पैसे जमा करणे किंवा काढणे यावर शुल्क आकारणी सुरु करण्यात आल्याचा दावा तसेच अहमदाबादमधील एका हाॅस्पिटलने रुग्णाला भेटायला येणा-या अतिरिक्त व्यक्तीकडून 500 रुपये शुल्क आकारणी सुरु केल्याचा दावाही या सप्ताहात व्हायरल झाला. हे आणि इतर दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप-5 फेक न्यूज वाचू शकता.
बॅंकेत पैसै जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी शुल्क द्यावे लागणार आहे. बॅंक आॅफ बडोदा ने याची सुरुवात देखील केली आहे हा नियम 1 नोव्हेंबर 2020 पासून लागू होणार असल्याचा दावा केला जात आहे. पडताळणीत हा दावा असत्य असल्याचे समोर आढळून आले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकानी पैसे आकारण्यास सुरुवात केलेली नाही. संपूर्ण फॅक्ट चेक इथे वाचा.
माजी क्रिकेटपटू कपिल देव यांचे निधन झाल्याची पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाली आहे. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार तसेच भारताला पहिला विश्वचषक जिंकून देणारे क्रिकेटपटू कपिल देव यांचे दु :खद निधन झाले. त्यांच्या स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली.” पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. कपिल देव अॅंजियोप्लास्टी झाल्यानंतर आपल्या घरी सुखरुप आहेत. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
तुर्कीमधील इजमिर शहरात भूकंपामुळे हाहाकार उडाला. या भूकंपात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 800जण जखमी झाले आहेत. सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो शेअर होत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे. पडताळणीत हे फोटो दोन वर्षांपासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
फोटोत पोलिस एका व्यक्तीला जमिनीवर आडवा करुन त्याचे पाय ओढत त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की पोलिसांनी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी सोबत अशी अमानवीय वर्तवणूक केली. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले. हा फोटो उत्तरप्रदेशातील आहे. त्याचा महाराष्ट्राशी संबंध नाही. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
हमदाबादच्या फिनिक्स हाॅस्पिटलचा फोटो शेअर करण्यात आला आहे व पोस्टमध्ये लिहिले आहे की, अहमदाबादच्या एका हाॅस्पिटलने आगळीवेगळी शक्कल लढविली आहे. रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णास भेटायचे असेल तर प्रति व्यक्ती 500 रुपये फी ( Entry Fee) घेतली जाते. परंतु हे असत्य आहे, संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.