Authors
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही सोशल मीडियावर फेक पोस्टचा पाऊस पडतच राहिला. एका महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या व्यक्तीला कोर्टरूममध्ये गोळ्या घालून ठार मारले त्याचे व्हिडीओ फुटेज, असा दावा करण्यात आला. तामिळनाडूतील महिलेने दुबईत एका पाकिस्तानी महिला बॉक्सरचे खुले आव्हान स्वीकारले आणि तिला काही वेळातच खाली पाडले, असा दावा झाला. पहिल्यांदा मशीद आणि चर्चमधील पैसे घेऊन या असे म्हणत कर्नाटकातील पुजारी सरकारी अधिकाऱ्यांशी भांडत आहेत, असा दावा करण्यात आला. उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये वृद्धावर लांडग्याच्या हल्ल्याचा व्हिडिओ, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
हे मुलीच्या बलात्काऱ्याला कोर्टात गोळ्या घालणाऱ्या महिलेचे फुटेज नाही
एका महिलेने आपल्या सात वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून खून करणाऱ्या व्यक्तीला कोर्टरूममध्ये गोळ्या घालून ठार मारले त्याचे व्हिडीओ फुटेज, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
तामिळनाडूतील महिलेने पाकिस्तानी लेडी बॉक्सरला खुले आव्हान स्वीकारून हरवले?
तामिळनाडूतील महिलेने दुबईत एका पाकिस्तानी महिला बॉक्सरचे खुले आव्हान स्वीकारले आणि तिला काही वेळातच खाली पाडले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकातील पुजाऱ्यांचा हा व्हिडीओ जुना आहे
पहिल्यांदा मशीद आणि चर्चमधील पैसे घेऊन या असे म्हणत कर्नाटकातील पुजारी सरकारी अधिकाऱ्यांशी भांडत आहेत, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.
हा व्हिडीओ बहराइचचा नाही
उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये वृद्धावर लांडग्याच्या हल्ला झाला असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा