Authors
मागील आठ्वड्यातही सोशल मीडियावर अनेक फेक दावे व्हायरल झाले. TRAI एका फोनमध्ये दोन सिम असलेल्या युजर्स कडून वाढीव शुल्क आकारणार आहे, असा दावा करण्यात आला. इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळ चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले, असा दावा करण्यात आला. वसई येथील युवतीचे खूनप्रकरण लव्ह जिहाद मधून झाले आहे, असा दावा करण्यात आला. मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे, असा दावा करण्यात आला. वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
ड्युअल-सिम युजर्सना दंड भरावा लागेल का?
TRAI एका फोनमध्ये दोन सिम असलेल्या युजर्स कडून वाढीव शुल्क आकारणार आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीचा संदर्भ देऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
केरळच्या चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले?
इन्कम टॅक्सच्या छाप्यात केरळ चर्चमधून 7000 कोटी रुपये जप्त करण्यात आले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
वसई येथील युवतीच्या खून प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ ची किनार नाही
वसई येथील युवतीचे खूनप्रकरण लव्ह जिहाद मधून झाले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही
मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीच्या संदर्भाने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जाते?
वाडीलाल आईस्क्रीममध्ये गोमांसाचे फ्लेवर वापरले जात असून त्यासाठी हलाल प्रमाणपत्र घेण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा