Thursday, April 18, 2024
Thursday, April 18, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख...

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

मागील आठवडाही अनेक चुकीची माहिती पसरविणाऱ्या पोस्टनी गाजल्या. सोशल मीडियावर अशा पोस्ट चर्चेत आल्या. भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत असा दावा करण्यात आला. औषधाच्या कॅप्सूलमध्ये खिळे घालून नवा जिहाद सुरु करण्यात आला आहे, असा एक दावा झाला. सरकारने सरपंच आणि उपसरपंचांचे पगार वाढविले असल्याचा एक दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल करण्यात आला. पुण्याच्या यशोदा इन्स्टिट्यूट मध्ये रक्ताचा कर्करोग पूर्ण बरा करणारे विनामूल्य औषध मिळते, योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतानला नमन केले आणि सीएसकेच्या विजयानंतर अहमदाबाद येथे ‘पिवळे वादळ’ उमटले. असे दावे करण्यात आले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा करणारे विनामूल्य औषध मिळते?

पुण्यातील यशोदा इस्पितळात रक्ताचा कर्करोग पूर्णपणे बरा करणारे विनामूल्य औषध मिळते, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत?

भारतीय चलनामध्ये ₹350 ची नवीन नोट आणि ₹75 व ₹60 ची नाणी आलेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतानला नमन केले नाही

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी टिपू सुलतान यांना श्रद्धांजली वाहिली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

‘पिवळे वादळ’ चा फोटो CSK चाहत्यांचा नाही

IPL 2023 फायनलच्या नंतर, अहमदाबाद, गुजरातमधील नरेंद्र मोदी स्टेडियमबाहेर CSK समर्थकांची प्रचंड गर्दी झाली आणि ‘पिवळे वादळ’ आले असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

सरपंचाला मिळणार ५० हजार मासिक वेतन?

महाराष्ट्र सरकारने ग्रामपंचायत सरपंच आणि उपसरपंच यांचे वेतन वाढविले आहे. आता सरपंचाला ५० हजार मासिक वेतन मिळणार आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे उघड झाले.

Weekly Wrap: चलनात नव्या नोटा, कॅप्सूलचा जिहाद, सरपंचांना पगारवाढ आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

खिळ्यांच्या कॅप्सूलद्वारे जिहाद सुरु आहे?

औषधांच्या कॅप्सूलमध्ये खिळे घालून नवा जिहाद सुरू झाला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular