Authors
कर्नाटक विधानसभेची निवडणूक १० मे रोजी झाली आणि निकाल १३ मे रोजी लागला. यामध्ये काँग्रेस पक्षाचा विजय झाला. या घटनेशी संबंधित अनेक खोटे दावे मागील आठवड्यात करण्यात आले. कर्नाटकात काँग्रेसला निवडून दिल्याबद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाझ शरीफ यांनी कर्नाटकाचे कौतुक केले. निवडणुकीत मतदान केंद्रांवर हेराफेरी आणि बोगस मतदान झाले. कर्नाटकात जैन मुनींवर मुस्लिमांनी हल्ला केला. असे दावे पाहायला मिळाले. भटकळ येथे काँग्रेसच्या विजयाच्या निमित्ताने पाकिस्तानचा ध्वज फडकविण्यात आला असा एक दावा करण्यात आला. काँग्रेसच्या विजयानंतर भाजपच्या झेंड्यावर गायीची कत्तल करण्यात आली. असा दावा एक व्हिडीओ शेयर करून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
काँग्रेसच्या विजयानंतर गायीची कत्तल झाली?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयानंतर काहींनी भाजपच्या झेंड्यावर एका गायीची क्रूरपणे कत्तल केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
भटकळ मध्ये फडकला पाकिस्तानचा ध्वज?
भटकळच्या काँग्रेस विजय जल्लोषात पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आढळला.
पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी कर्नाटकचे कौतुक केलेले नाही
पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी ट्विटरवर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून दिल्याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे अभिनंदन केले आहे. असा दावा आमच्या तपासात खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कर्नाटकात बोगस मतदान झाले?
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मतदान केंद्रांवर हेराफेरी झाली आणि बोगस मतदान करण्यात आले, असा दावा करण्यात आला. मात्र हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे आमच्या तपासात सिद्ध झाले.
जैन मुनींना मुस्लिमांनी मारहाण केली नाही
कर्नाटकात काँग्रेसच्या विजयानंतर मुस्लिमांनी जैन मुनीवर हल्ला केला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: +91 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in