Friday, April 26, 2024
Friday, April 26, 2024

HomeFact Checkमनमोहन सिंह आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या भेटीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल

मनमोहन सिंह आणि श्रीलंकेच्या पंतप्रधानांच्या भेटीचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने व्हायरल

Authors

दावा

” श्रीलंकेच्या पंतप्रधानांसोबत बैठकीत तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या एेवजी सोनिया गांधी खुर्चीत बसल्या होत्या”.

सोशल मीडियात माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि सोनिया गांधी यांचा श्रीलंकेच्या पंतप्रधानसोबत एक व्हिडिओ क्लिप व्हायरल होत आहे. यात दावा करण्यात येत आहे की “मनमोहनसिंह जेव्हां पंतप्रधान होते तेव्हा श्रीलंकेच्या पंतप्रधानांनी त्यांना बैठकीत खुर्चीवर बसण्यासाठी निमंत्रित केले असता त्याच्या जागी तत्कालीन काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी बसल्या. यावरुन लक्षात येत असेल की त्यावेळी सरकारचे निर्णय कोण घेत असेल.”

पडताळणी

 या व्हिडिओमध्ये माजी पंतप्रधान मनोहनसिंह श्रीलंकेचे तत्कालीन पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे व आणि काॅंग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी दिसत आहेत. रानिल विक्रमसिंघे  मोहनमोहन सिंह यांना बसण्याची विनंती करताना दिसत आहेत त्याचवेळी सोनिया गांधी त्या खुर्चीवर बसत असतानाचा मनमोहन सिंह यांना देखील बाजूच्या खुर्चीत बसण्याची विनंती करत आहे. याच वेळी दोन बाॅडीगार्ड मनमोहन सिंह यांच्या शेजारी उभे राहत असल्याचे दिसत आहे.  आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये शोध घेतला असता आम्हाला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या पराॅडी ट्विटर अकाउंटवर एक पोस्ट आढळून आली. यात हाच व्हिडिओ याच दाव्याने शेअर करण्यात आला आहे. 

ट्विटर/ संग्रहित

अधिक शोध घेतला असता फेसबुक वर दोन वर्षांपूर्वी हा दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याचे आढळून आले. 

या दाव्या संदर्भात दोन वर्षापूर्वीच्या पोस्ट आढळल्याने हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याचा अधिक शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता एएनआयचे 25 एप्रिल 2017 रोजीचे ट्विट आढळले. यात म्हटले आहे की श्रीलंकेचे पंतप्रधान पाच दिवसांच्या भारत दौ-यावर आले असताना त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंह आणि काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतली. 

सन 2014 ते 2019 पर्यंत आणि त्यांनतर दुस-यांदा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदावर कार्यरत आहेत. त्यामुळे पोस्टमध्ये जो दावा करण्यात येत आहे तो चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ मनमोहन सिंह पंतप्रधान होते त्यावेळचा नाही.


Source – Twitter Advanced, Search Facebook , Google Search 

Result- Misleading 

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular