Claim :
Congress spokesperson Sanjay Jha converted to Islam
मराठी अनुवाद- काॅंग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला.
Verification-
फेसबुकवर अनेक वापरकर्त्यांनी 19 डिसेंबर रोजी इंडियन नॅशनल कॉंग्रेसचे प्रवक्ते संजय झा यांची टोपी घातलेला फोटो शेअर केला आहे संजय झा हे अखिल भारतीय व्यावसायिक कॉंग्रेस, महाराष्ट्रचे अध्यक्षही आहेत. व्हायरल फोटो फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केली गेल आहे, यात “कांग्रेस प्रवक्ते संजय झा यांनी इस्लाम धर्म स्वीकारला ” असा मजकूर लिहिण्यात आला आहे .


ट्विटर आणि फेसबुकवर अनेकांनी हाच फोटो शेअर केला आहे. आम्ही व्हायरल दाव्यांची सत्यता तपासू लागताच आम्हाला आढळले की संजय झा यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर देखील हा फोटो शेअर केली होता. त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर संजय झा यांनी टोपी परिधान केलेला फोटो दिसत आहे दिसू शकते. झा यांनी 19 डिसेंबर 2019 रोजी त्याने आपले प्रोफाइल चित्र बदलले. त्यानंतर सोशल मीडियावर झा यांच्याबाबतीत अनेक दावे व्हायरल होत आहेत.
#NewProfilePic pic.twitter.com/XIO3mMlYBW
— Sanjay Jha (@JhaSanjay) December 19, 2019
व्हायरल दाव्याबाबत तपासणी करत असताना आम्हाला न्यूज 18 इंडिया अहवाल आढळला. न्यूज 18 इंडियाशी बोलताना संजय झा म्हणाले, “हा देश महात्मा गांधींचा आहे म्हणून मी हे हेतुपुरस्सर केले आणि धर्माच्या नावाखाली कोणीही देशातील धर्मनिरपेक्षता नष्ट करू शकत नाही”. ते पुढे म्हणाले की, “धर्माच्या नावाखाली क्षुद्र राजकारण केले जात आहे आणि एकमेकांमध्ये बंधुता आणि ऐक्य दाखवण्याची वेळ आता आली आहे”

Tools Used
Google Search
Twitter Search
Result: Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in