Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeFact Checkपंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खानसोबत भोजन केले नाही, व्हायरल झाला खोटा दावा

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खानसोबत भोजन केले नाही, व्हायरल झाला खोटा दावा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim–  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या सोबत बिर्याणीचा आस्वाद घेतला होता.

Verification
शाहीन बाग आंदोलनादरम्यान तेथे तयार करण्यात येणा-या बिर्याणीची चर्चाही खूप झाली. तसेच याबाबत चित्रपट निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप याने ट्विटही केले होते. यात टविटला प्रत्युत्तर देताना एका यूजर ने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांचा एकत्र जेवण करतानाचा फोटो शेअर करुन बिर्याणीचा स्वाद कसा होता हे पंतप्रधांना विचारा असा प्रश्न देखील विचारला आहे. या फोटोत मोदींनी हिरवी टोपी घातल्याचेही दिसते.
आम्ही या फोटोसंदर्भात पडताळणी सुरु केली असता मागील वर्षीचे एक ट्विट आढळून आले. यात म्हटले आहे की हिरव्या टोपीतील मौलाना ओळखीचे वाटतात.
फोटोबद्दल पूर्ण माहिती नसल्याने आम्ही रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने याचा शोध घेतला असता आम्हाला इमरान खान यांचा पत्नीसोबत डिनर करत असल्याचे एक ट्विट आढळून आले.  ट्विटरवर हे फोटो चार वर्षांपूर्वी शेअर करण्यात आलेले आहेत.
यावरुन हेच सिद्ध होते की व्हायरल फोटो हा एडिटेड आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांनी कधीही एकत्र जेवण केल्याच्या बातम्या मुख्य प्रवाहातील माध्यमांत नाहीत किंवा याबाबत दोन्ही नेत्यांनी कधीही जाहीरपणे सांगिलतेलले नाही.
मोदींचा फोटो सात वर्षापूर्वी इंडियन एक्सप्रेसने प्रकाशित केला होता तोच फोटो एडिट करुन इम्रान खानच्या फोटोसोबत जोडून भ्रामकता निर्माण केली जात आहे.
Source 
Twitter Advanced Search
Google Reverse Image Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular