Saturday, July 27, 2024
Saturday, July 27, 2024

HomeMarathiपित्याने मुलींना गळफास दिल्याची जुनी बातमी चुकीच्या दाव्यानिशी झाली व्हायरल

पित्याने मुलींना गळफास दिल्याची जुनी बातमी चुकीच्या दाव्यानिशी झाली व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim– 

तामिळनाडूमध्यो दोन शाळकरी मुलींचे अपहरण करुन त्यांच्या किडण्या काढण्यात आल्या. त्यानंतर त्यांची प्रेते जंगलातील झाडावर लटकविण्यात आली. 

Verification-    
 
आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅपवर हा मॅसेज पाठवून आम्हाला या व्हायरल फोटोची पडताळणी करण्याची विनंती केली। वाचकाच्या म्हणण्यानुसार त्यांना हा मॅसेज एका व्यक्तीने व्हाट्सअॅपवर पाठवला आहे. यात लिहिले आहे की तामिळनाडूमध्ये दोन शाळकरी मुलींचे अपहरण करण्यात आले आणि त्यांच्या किडण्या काढल्या. यानंतर त्यांची प्रेते झाडाला लटकवण्यात आली.
 
आम्ही व्हायरल मॅसेज आणि फोटोसंदर्भात पडताळणी सुरू केली। गूगल रिव्हर्स इमेजच्या मदतीने फोटोचो शोध घेतला असता याचे अनेक रिझल्ट दिसून आले। हा फोटो अनेक ट्विटर आणि फेसबुक अकाउंट्सवरुन वेगवेगळ्या दाव्यानिशी मागील दोन वर्षांपासून शेअर होत असल्याचे दिसून आले. 
 
याशिवाय आम्हाला असाचा दावा करणारे मागील वर्षीचे एक ट्विट आढळून आले त्यात लिहिले होते की कृपा करुन हा मॅसेज आपल्या कुटूंबियांना मित्राना तसेच मिडिया आणि सरकार देखील पाठवा यामुळे मुलांच्या सुरक्षिततेबद्दल लोकांमध्ये जागरुकता निर्माण होईल. 
 
हा फोटो आम्हाला एका फेसबुक पोस्टमध्ये देखील मिळाला, पण या पोस्टमध्ये या मुलींनी उपासमारीने आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आला होता. 
 
फेसबुक पोस्टमध्ये याविषयी पूर्ण माहिती दिली नसल्याने आम्ही पडताळणी सुरू ठेवली असता यूट्यूबवर दोन वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ मिळाला. 
 
 या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिहिले होते- आता कुठे गेले मोर्चा वाले हि नाही का बहीण आपली या निरागस बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढे या भावांनो .पुढे नाही पाठवलं तर तुम्हाला तुमच्या बहिणीची शपथ आहे.
 
या व्हिडिओतून देखील मुलींबद्दल खरी माहिती मिळाली नाही. यामुळे आम्ही गूगल मध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला सामना मध्ये दोन वर्षापूर्वी छापलेली बातमी मिळाली. या बातमीत म्हटले होते की सोलापूर जिल्हातील माळशिरसमध्ये सुभाष अनुसे नावाच्या इसमाने आपल्या पत्नीची दगडाने ठेचून हत्या केली तसेच आपल्या दोन मुलींना गळफास देऊन स्वत देखील जीवन संपविले. पोलिसांनी कौंटुंबिक वादातून हे प्रकरण घडल्याचे सांगितले.
 
याशिवाय लोकसत्तात देखील ही बातमी छापून आली होती. या बातमीत म्हटले होते की सुभाषने चारित्र्याच्या संशयावरुनच आपल्या पत्नीची दगडाने ठेचून तर मुलींची गळफास देऊन हत्या केली. 
 
यावरुन स्पष्ट होते की व्हायरल फोटो हा तामिळनाडूमधील मुलींचा किंवा उपासमारीने आत्महत्या करणा-्या मुलींचा नाही तर पित्यानेच आपल्या पोटच्या मुलींची गळफास देऊन हत्या केली होती. सोशल मिडियात हा फोटो अनेक खोट्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे. 
 
Tools Used 
 
  • Twitter Advanced Search
  • Google Reverse Image Search 
  • Google Keywords Search 
 
Result- False
 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला ईमेल करा checkthis@newschecker.in)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular