सोशल मीडिया हे असे एक माध्यम आहे जेथे दररोज फेक न्यूज मोठ्या प्रमाणात शेअर होतात. सोशल मीडिया युजर्स दिशाभूल करणारी किंवा चुकीची माहिती शेअर करताना दिसतात. या आठवड्यात असेच काही घडले. कोरोना लस तसेच इतर अनेक विषयांवर युजर्सनी या आठवड्यात चुकीची माहिती शेअर केली. आमच्या टीमने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या काही खोट्या दाव्यांचा पर्दाफाश केला आहे आणि त्यांचे सत्य आपल्यासमोर मांडले आहे.

जगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड कर्नाटकात आहे?
सोशल मीडियात सध्या एका झाडाचा फोटो व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, हा फोटो कर्नाटकमधील बिलीगिरांगना बेट्टा येथील तुळशीच्या झाडाचा असून हे जगातील सर्वात मोठे तुळशीचे झाड आहे. पण हे सत्य नाही. जगातील सर्वात मोठे तुलशीचे रोप परदेशात आहे. भारतात नाही. तसेच व्हायरल फोटोतील झाड तुळशीचे नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

पावसात मेनहोलमध्ये पडून गायब झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ खरा नाही, हे आहे सत्य
पावसात मेनहोलमध्ये पडून गायब झालेल्या व्यक्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. यात एक व्यक्ती पावसात छत्री घेऊन रस्ता ओलांडून येत असताना रस्त्याचा कडेला पाणी साठलेल्या मेनहोल मध्ये अचानक पडतो व गायब होतो. पण हे खरे नाही. विशिष्ट साॅफ्टवेअरच्या मदतीने हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

विक्रीचे लक्ष्य पूर्ण झाल्याने टाटा मोटर्स सफारी गाडी मोफत देत आहे का? हे आहे सत्य
एक मेसेज सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या मेसेज सोबत एक लिंक शेअर केली जात आहे. यात म्हटले आहे की टाटा मोटर्सने 30 लाख सफारी गाड्यांच्या विक्रीचे लक्ष्य पूर्ण केल्याने टाटा सफारी मोफत मिळविण्याची संधी आपणास उपलब्ध झाली आहे. पण हे सत्य नाही. टाटा मोटर्सने अशी योजना सुरु केलेली नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते? हे आहे सत्य
कोरोना प्रतिबंधक लस घेतल्यानंतर शरीरात चुंबकत्व निर्माण होते, असा प्रत्यय नाशिकमधील ज्येष्ठ नागरिकाला आला असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे तसचे अनेक न्यूजवेबसाईट्स आणि चैनल्सने ही बातमी प्रसारित केली आहे. याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पण हा दावा खोटा असल्याचे तज्ज्ञ लोकांनी सांगितले आहे. फॅक्ट चेकिंग इथे वाचा
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.