Sunday, June 23, 2024
Sunday, June 23, 2024

HomeMarathiबसपा नेते सुनील खांबे यांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी होतोय व्हायरल,...

बसपा नेते सुनील खांबे यांच्या ईव्हीएमविरोधी आंदोलनाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी होतोय व्हायरल, जाणून घ्या काय आहे सत्य? 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim
रिट्विट सरकार नावाच्या हॅंडलद्वारे एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात एक व्यक्ती मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन वर शाई फेकतो आणि ईव्हीएम मुर्दाबाद ईव्हीएम नही चलेगा चा नारा देत असल्याचे दिसून येते. ट्विटमध्ये दावा केला आहे कि या व्यक्तीने मतदान करताना काॅंग्रेसचे बटन दाबले होते पण ते मत भाजपाला गेल्याने तो भडकला आणि त्याने मतदान केंद्रातच गोंधळ घातला. 
Verification
ट्विटमध्ये करण्यात आलेला दाव्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी आम्ही यासंबंधी शोध सुरू केला. प्रथम या व्हिडिओमधून काही स्क्रिनशाॅट्स काढून ते गुगल रिवर्स इमेज मध्ये शोधले असता आम्हाला दैनिक सामनात छापून आलेली बातमी सापडली. या बातमीनुसार  21 आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होते. ठाण्यात बसपा नेते यांनी दुपारी मतदान केंद्रावर गोंधळ घातल्याने त्यांना पोलिसांनी अटक केली. खांबे यांनी ईव्हीएम मशीन तोडून त्यामध्ये काळी शाई ओतली तसेच   ईव्हीएम मुर्दाबाद, ईव्हीएम नहीं चलेगा अशा घोषणाही दिल्या. पोलिसांनी त्यांना उचलबांगडी करत अटक केली. यानंतर खांबेंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. मात्र सामनाच्या बातमीत कुठेही ईव्हीएममध्ये चुकीचे मतदान होत असल्याने खांबे यांनी गोंधळ घातल्याचा उल्लेख नव्हता.
याबातमी सोबतच आम्हाला एएनआय चे ट्विट देखील मिळाले. या ट्विटमध्ये देखील ईव्हीएम मध्ये गडबड असल्याने खांबे यांनी गोंधळ केल्याचा उल्लेख नाही.
रिपब्लिक चॅनलच्या ट्विटमध्ये देखील ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याने खांबे यांनी गोंधळ घातल्याचा दावा करण्यात आलेला नाही.
अधिक शोध घेतला असता आम्हाला सुनील खांबे यांनी माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया मिळाली. खांबे सांगितले की माझे हे ईव्हीएम विरोधातील आंदोलन करण्याचे आधीच ठरले होते. माझ्या मतदानात कुठलीही गडबड झाली नाही. मला ईव्हीएम द्वारे मतदानाचा राग आहे त्यामुळेच मी हे आंदोलन केले.
यावरुन स्पष्ट होते की बसपा नेते सुनील खांबे यांनी मतदान करताना ईव्हीएममध्ये बिघाड झाला नव्हता, त्यांचे मत दुस-या पक्षाच्या उमेदवाराला गेले नव्हते. सोशल मिडियात त्यांच्या आंदोलनाचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे.
Tools Used 
  • Twitter Advanced Search
  • Google Reverse Image
Result- Misleading

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular