Claim–
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन सीएए विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या.

Verification–
सोशल मीडियामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पत्नी जशोदाबेन काही महिलांसोबत आंदोलन करत असलेला फोटो व्हायरल होत आहे. या फोटो संदर्भात दावा करण्यात येत आहे की जशोदाबेन सीएएस एनआरसी या कायद्याच्या विरोधात सुरु असलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या आहेत.
@AltNews plz verify this picture showing JASODA BEN protesting against CAA NRC NPR pic.twitter.com/qMWlRSZob0
— MUNEER (@mamuneer433) January 22, 2020


आम्ही याबाबत शोध घेण्याचा प्रयत्न केला. व्हायरल फोटो गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोधला असता आम्हाला चार वर्षापूर्वीची बातमी deccanchronicle मध्ये आढळून आली. या फोटोच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की मान्सुनमध्ये खराब झोपड्या हटण्याच्या कारवाईविरोधात जशोदाबेन यांनी धरणे उपोषण केले.

याशिवाय द हिंदू या वेबसाईटवर देखील ही बातमी प्रकाशित करण्यात आली होती. या बातमीत देखील म्हटले आहे की, जशोदाबेन या मुंबईतील आझाद मैदानात उपोषणास बसल्या.

यावरुन हेच स्पष्ट होते की जशोदाबेन सीएएस विरोधी आंदोलनात सहभागी झाल्या नाहीत तर त्यांचा चार वर्षापूर्वीचा आंदोलनाचा फोटो चुकीच्या दाव्यानिशी सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)