दाव्याचे संक्षिप्त विवरण–
कोरोना व्हायरसच्या संदर्भात अनेक पोस्ट सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. आमच्या एका वाचकाने व्हाट्सअॅप्प वर व्हाययरल होत असलेला असाच एक मॅसेज पडताळणी करण्यासाठी आम्हाला पाठवला आहे. यात अपोलो हाॅस्पिटल आणि आरोग्य विभागाच्या डाॅक्टरांनी करोनापासून बचावासाठी काही घरगुती उपाय सांगितलेले आहेत. लसूण खाणे, हळदी दूध, डाळिंब पपई, ग्रीन टी ओवा तुळशीचे पाने, काळी मिरी आले यांचा काढा इत्यादी उपाय सांगितले आहेत.
Verification–
सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या या मॅसेजची पडताळणी करण्याचे आम्ही ठरविले. मॅसेजमधील काही किवर्ड्सच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला फेसबुवक हाच दावा असणारी एक पोस्ट आढळून आली. यात पोस्टमध्ये ही अपोलो हाॅस्पिटल दिल्लीचे डाॅक्टर A. Dhanthi आणि बिहार राज्य आरोग्य विभागाचे डाॅक्टर Ramesh सिंह यांच्या नावाचा उल्लेख आहे.
आम्ही अपोलो हाॅस्पिटलमध्ये Dr. A Dhanti नावाचे डाॅक्टर आहेत का याचा शोध घेतला. यासाठी हाॅस्पिटलच्या
वेबसाईटवर डाॅक्टरांच्या टीम बद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. असता आम्हाला डाॅक्टरांंच्या टीम बद्दल माहिती मिळाली मात्र यात व्हायरल पोस्टमधील डाॅक्टरांचे नाव आढळून आले नाही.
यानंतर
बिहार आरोग्य विभागाच्या वेबसाईटवर तपासून पाहिले असता तेथे आम्हाला रमेश सिंह नावाचे डाॅक्टर किंवा कोरोना विषयी व्हायरल पोस्ट बद्दल काही माहिती आढळून आली नाही.
यानंतर आम्ही
आरोग्य आणि कुटूंब कल्याण विभागाच्या वेबसाईटवर याबाबत काही माहिती दिली आहे का याचा शोध घेतला पण तिथेही व्हायरल पोस्ट मधील उपाय सांगितलेेले नाहीत असे आढळून आले. त्यांनतर आम्ही जागतिक आरोग्य संघटनेच्या वेबसाईटवर याबाबत काही माहिती मिळतेय के तपासून पाहिले. संघटनेने कोरोना व्हायरसवर सध्या तरी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे त्यामुळे काळजी घेणे हेच बचाव करण्याचे साधन असल्याचे म्हटले आहे.
तसेच जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, काही पाश्चिमात्य आणि घरगुती उपायांनी तात्पुरता दिलासा मिळेल पण यामुळे बचाव होणे शक्य नाही त्यामुळे हे औषध किंवा उपाय हा व्हायरस नष्ट करु शकतो याला पुरावा नाही त्यामुळे WHO याची सिफारश करत नाही. WHO सह जगभरात कोरोनाच्या लसी आणि औषधे याबाबत संशोधन सुरु आहे. सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नाही.
यावरुन हेच स्पष्ट होते की कोरोना व्हायरसपासून बचाव करण्याचा मॅसेज हा खोटा असून यात कोणतेही तथ्य नाही. जागतिक आरोग्य संघटनेने अशा उपायांना मान्यता दिलेली नाही.
Source
facebook
Google
Result- False
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)