Monday, March 4, 2024
Monday, March 4, 2024

HomeCoronavirusससून हाॅस्पिटलच्या नावाने रुग्णांच्या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, हे आहे सत्य

ससून हाॅस्पिटलच्या नावाने रुग्णांच्या गर्दीचा व्हिडिओ व्हायरल, हे आहे सत्य

Authors

पुण्यातील ससून हाॅस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला आहे. तीस सेंकदांच्या या व्हिडिओमध्ये मास्क परिधान केलेले शेकडो लोक रुग्णालयात जमा झाल्याचे दिसत आहेत. या गर्दीचा व्हिडिओ रेकाॅर्ड करणारा व्यक्ती इंग्रजीमध्ये बोलत आहे तो म्हणत आहे की, “ओपीडीच्या तळ मजल्यावरील खोली क्रमांक 5 समोर ही गर्दी आहे मॅडम. इथल्या रूग्णांची संख्या पाहता रूग्णांसह रुग्णालयातील सर्व डॉक्टर व कर्मचार्‍यांना हा संपूर्ण धोका आहे. म्हणूनच मी हा व्हिडिओ तुम्हाला फॉरवर्ड करत आहे मॅम.मी डॉक्टर राणा सिंह आहे. धन्यवाद मॅम. ओपीडी 5 च्या समोर लोकांची ही शंभराहून अधिक आहे. कृपया लवकरात लवकर त्वरित कारवाई करावी. धन्यवाद”

आमच्या एका वाचकाने हा व्हिडिओ नेमका सूसन रुग्णालयातीलच आहे का याची पडताळणी करण्यासाठी आम्हाला व्हाटस्एप्पवर फाॅरवर्ड केला आहे.

पडताळणी

व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याबाबत आम्ही शोध सुरु केला असता फेसबुकवर हा व्हिडिओ ससून हाॅस्पिटलमधील असल्याचा दावा करणा-या अनेक पोस्ट आढळून आल्या.

https://www.facebook.com/umesh.nalge/videos/3456174581129504

संग्रहित

https://www.facebook.com/umesh.nalge/videos/3456174581129504/?fallback=1
https://www.facebook.com/sonu.khanna.771/posts/1684416221710512

हा व्हिडिओ ट्विटरवर देखील व्हायरल होत आहे.

ही गर्दी बिहारची राजधानी पाटणामधील महावीर कर्करोग संस्थानमधील ओपीडी सेंटरमधील असल्याची माहिती इंडिया टिव्हीच्या बातमीत देण्यात आली आहे. यात म्हटले आहे की, हे सर्व कर्गरोगाचे रुग्ण आहेत सगळ्यांना आपल्यावर इलाज करुन घ्यायचा आहे. मागील आठवड्यात संस्थानमधील काही पेशंट आणि स्टाफ मेंबर्स कोरोना पाॅझिटिव्ह आढळले त्यामुळे सॅनिटायजेशनसाठी हाॅस्पिटल बंद करावे लागले. दोन दिवसांपूर्वी जेव्हा हाॅस्पिटल सुरु झाले तेव्हा रुग्णांची गर्दी वाढली. बिहारमधील अनेक हाॅस्पिटल फक्त कोरोना रुग्णासाठीच सुरु आहेत त्यामुळे इतर हाॅस्पिटलमधील कर्करोगाचे रुग्ण देखील महावीर हाॅस्पिटलमध्ये येत आहेत. त्यामुळे गर्दी वाढत चालली आहे. अचानक एवढी गर्दी वाढल्याने हाॅस्पिटल व्यवस्थापनाला याची माहिती देण्यात आली.

व्हिडिओ रेकाॅर्ड करणारी व्यक्ती आपले नाव डाॅ. राणा सिंह असे सांगत असल्याचे दिसते. यावरुन महावीर कर्करोग संस्थानात या नावाचे डाॅक्टर आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. संस्थानच्या वेबसाईटवर आम्हाला डाॅक्टरांच्या यादीत हे नाव आढळून आले.

महावीर कर्करोग संस्थान महावीर मंदिर ट्रस्टशी संबंधित आहे. माजी आयपीएस अधिकारी किशोर कुणाल हे ट्रस्टचे सचिव आहेत. 18 जुलै रोजी त्यांनी हिंदीमध्ये यासंदर्भात एक पोस्ट फेसबुकवर शेअर केली होती.

https://www.facebook.com/acharyakishorekunal/posts/282117026553435

यावरुन हेच स्पष्ट होते की, रुग्णांच्या गर्दीचा व्हिडिओ हा पुण्यातील ससून हाॅस्पिटलमधील नसून बिहारची राजधानी पाटणामधील महावीर कर्करोग संस्थानच्या हाॅस्पिटलमधील आहे. सोशल मीडियामध्ये हा व्हिडिओ वेगवेगळ्या शहरांच्या नावाने व्हायरल होत आहे.

Source

  • Whatsapp
  • Facebook
  • Google

Result- Misleading

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular