चंद्रपूरमधील धानोरा गावात गुराख्याला वाघांनी ठार केले. व्हिडिओ झाला व्हायरल
Verification –
सोशल मीडियामध्ये सध्या एका व्यक्तीला वाघांनी ठार केल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिसंदर्भात दावा करण्यात येत आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील संतोष खमोनकार नावाच्या व्यक्तिला वाघाने हल्ला करुन ठार केले आहे.आमच्या एका वाचकांने हा या व्हिडिओची व्हाट्सअॅप वर मिळाला. त्याने याची सत्यता तपासण्यासाठी आम्हाला हा व्हिडिओ फाॅरवर्ड केला.
या व्हिडिओ संदर्भात आम्ही शोध घेतला असता फेसबुक वर देखील एका पोस्टमध्ये हा व्हिडिओ आढळून आला. यात देखील हाच दावा करण्यात आला आहे.
See posts, photos and more on Facebook.
दोन्ही पोस्टमध्ये घटना नेमकी कधी घडली याविषयी माहिती दिलेली नसल्याने आम्ही याबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्ड्सच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला
ईटीव्ही भारत या वेबसाईटवर ही बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की,
राजुरा तालुक्यातील धानोरा येथे वाघाच्या हल्यात गुराखी ठार झाल्याची घटना घडली. संतोष खमोनकर असे मृत गुराखीचे नाव आहे. राजुरा तालुक्यात वाघ-मानव संघर्ष दिवसेगणिक अधिक तीव्र होत चालला आहे. वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची ही चौथी घटना असून यामुळे परिसरात दहशत पसरली आहे.
मात्र या बातमीत मृत इसमाचा जो फोटो आहे तो व्हायरल दाव्यातील व्हिडिओतील इसमा पेक्षा वेगळा दिसत आहे.
या फोटोतील इसमाने हिरव्या रंगाचा स्वेटर घातला आहे तसेच त्यांच्या डोक्यावर भरपूर केस आहेत. व्हायरल व्हिडिओतील इसमाने जांभळ्या रंगाचा शर्ट घातला आहे शिवाय त्याच्या डोक्यावर फारच कमी केस असल्याचे स्पष्ट दिसते. आपण खालील फोटोत हे पाहू शकता.
यावरुन व्हिडिओत दिसणारी व्यक्ती ही संतोष खमोनकर नसून दूसरीच आहे हे स्पष्ट झाले. मात्र हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळत नव्हती. आम्ही यातील काही स्क्रिनशाॅट्स काढून
गूगल रिव्हर्सच्या सहाय्याने शोध सुरू केला असता आम्हाला हा व्हिडिओ चीनमधील प्राणी संग्रहालयात वाघांच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचा असल्याचे समजले. ही घटना दोन वर्षापूर्वीची असल्याचे शोध दरम्यान वेगवेगळ्या वेबसाईट्सवर प्रकाशित झालेल्या बातम्यांवरुन समजले.
याशिवाय आम्हाला
https://www.china.org.cn या वेबसाईटवर देखील ही बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की पूर्व चीनमधील निंगबो शहरात रविवारी दुपारी एका प्राणिसंग्रहालयात वाघाने हल्ला केलेल्या व्यक्तीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. डिंगकियान लेक टूरिस्ट आणि प्राणीसंग्रहालय असलेल्या शहरातील हॉलिडे रिसॉर्टच्या प्रशासकीय समितीच्या म्हणण्यानुसार, निंग्बो यंगोर प्राणीसंग्रहालयात टायगर हिलच्या बंदिस्त ठिकाणी दुपारी दोन वाजता वाघांनी पर्यटकावर हल्ला केला. पोलिसांना वाघाला गोळ्या घालून ठार केले व जखमी पर्यटकाला रुग्णालयात हलविले मात्र त्याचा मृत्यू झाला.
यावरुन हे स्पष्ट होते की व्हायरल व्हिडिओ चंद्रपूर जिल्ह्यातील धानोरा गावचा नसून चीनमध्ये दोन वर्षापूर्वी पर्यटकावर वाघांनी केलेल्या हल्ल्याचा आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल केला जात आहे.
Tools Used
Facebook Search
Google Reverse Image Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)