Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeCoronavirusहर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन चूक झाल्याचा संदेश दिला नाही, जाणून...

हर्षवर्धन पाटील यांनी भाजपात प्रवेश करुन चूक झाल्याचा संदेश दिला नाही, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा- हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन चूक झाल्याचा संदेश दिला आहे.

सोशल मीडियामध्ये माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. यात पाटील यांनी चेह-यावर मास्क लावला असून ते हातात फलक घेऊन उभे आहेत. या फलकावर ‘माझं चुकलं मी भाजपात गेलो # महाराष्ट्रद्रोही भाजपा’ असे लिहिलेले आहे.

पडताळणी-  आम्ही या संदर्भात पडताळणी करण्यसाठी गूगलमध्ये काही किवर्डसचा वापर केला असता व्हायरल फोटोच्या अनेक पोस्ट दिसून आल्या ज्यात माझं चूकलं मी भाजपात गेले असा मजकूर लिहिलेला फलक हातात घेऊन हर्षवर्धन पाटील घराच्या बाहेर उभे असलेले दिसत आहे.

https://www.facebook.com/permalink.php?story_fbid=2496013344045023&id=100009091455751

अर्काइव्ह

अर्काइव्ह

हर्षवर्धन पाटील यांच्या संदर्भात  सोशल मीडिया व्यतिरिक्त मुख्य प्रवाहातील माध्यमांत बातमी प्रसिद्ध झाली आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता पोलीसनामा या वेबसाईटवर 22 मे रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. यात हर्षवर्धन पाटील यांचा व्हायरल फोटो आहे मात्र पाटील यांच्या हातातील फलकावर केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारने शेतकरी मजुरांसाठी पॅकेज जाहिर करावे असे लिहिले आहे. तसेच त्यांच्या शेजारी उभ्या असणा-या युवकाच्या हातात अकार्यक्षम सरकार हटाव महाराष्ट्र बचाओ लिहिलेला फलक आहे. बातमीनुसार, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यास राज्य सरकार अपयशी ठरल्याच्या निषेधार्थन भाजपच्या वतीने राज्यात आंगण ते रणांगण आंदोलन करण्यात आले होते. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी देखील पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथील आपल्या घरी राहत्या घराच्या अंगणात त्यांचे सुपुत्र तसेच नीराभीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्यासोबत हातात निषेधाचे फलक घेऊन आंदोलन केले. 

याबाबत सकाळमध्ये ही बातमी प्रसिद्ध झाली आहे. याशिवाय हर्षवर्धन पाटील यांनी देखील घरी राहून केलेल्या आंदोलनाचे फोटो ट्विट केले आहेत. यात त्यांनी कोरोना महामारीमुळे राज्यावर ओढावलेले संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या महाआधाडी सरकारचा निषेध केला असल्याचे म्हटले आहे.

https://twitter.com/Harshvardhanji/status/1263724465730367489

यावरुनच हेच स्पष्ट झाले की भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा फोटो एडिट करुन व्हायरल करण्यात आला आहे. 

source
Facebook, Twitter Advanced Search, Google 
Result- Fabricated News/ False content

(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.) 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular