Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
आॅनलाईन क्लास दरम्यान 55 वर्षीय शिक्षकाला विद्यार्थ्यांनी त्रास दिल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसचे वाढते प्रमाण पाहता शाळा, काॅलेजेस कधी सुरु होतील हे सांगता येत नाही. अशात शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडे आॅनलाईन शिक्षण हाच पर्याय सध्या तरी उपलब्ध आहे. बरेच शाळा, काॅलेजेस आॅनलाईन क्लास घेत आहेत. यासंदर्भातली एक घटना सध्या सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एक फोटो शेअर केला जात आहे दावा करण्यात येत आहे की एका 55 वर्षीय शिक्षकाला विद्यार्थ्यांनी शिव्या दिल्या
दैनिक लोकसत्ता ने या विषयी वृत्त दिले आहे. यात म्हटले आहे की, इन्स्टाग्रामवरील टेड तर स्टोनर नावाच्या अकाउंटवरुन एका ५५ वर्षीय प्राध्यापकाच्या झूम लेक्चरदरम्यानचा स्क्रीनशॉर्ट शेअऱ करण्यात आला आहे. या फोटोबरोबर शेअऱ करण्यात आलेल्या मजकुरामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षकांची मस्करी करणे कशापद्धतीने चुकीचे असून ते विद्यार्थ्यांसाठी काय काय करत आहे यासंदर्भातील भावनिक पण वास्तवदर्शी मुद्दे मांडण्यात आले आहेत.
याशिवाय India Todayआणि The Tribune ही मार्मिक पोस्ट आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. ही स्टोरी अनेक यूजर्सनी शेअर केल्याचे आपण Crowdtangle च्या माध्यमातून पाहू शकता.
फेसबुकर देखील ही पोस्ट मोठ्या प्रमाणात ही पोस्ट व्हायरल होत आहे.
पडताळणी
शिक्षकाची ही कहाणी हृदयस्पर्शी असल्याने आम्ही याबाबतीत अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला, यासाठी गूगल रिव्हर्स इमेजचा आधार घेतला.
शिक्षकाचा हा आणि त्याची हृदयस्पर्शी कहाणी अनेक लोकांनी शेअर केल्याचे आढळून आले. यात म्हटले आहे की, मुख्यध्यापकांनी अचानक ५५ वर्षीय प्राध्यापकांना ऑनलाइन वर्ग कसे घ्यावेत हे शिकून घेण्यास सांगितलं. त्यावेळी त्यांना काहीच बोलता आलं नाही कारण नकार दिला तर नोकरी जाईल हे त्यांना समजलं होतं. या परिस्थितीमध्ये आणि या वयामध्ये दुसरं कोणतं काम आपल्याला जमणार नाही याची त्यांना जाणीव आहे. कुटुंबासाठी त्यांना हे करण्याशिवाय दुसरा पर्याय त्यांच्याकडे नव्हता. मात्र त्यांना नवी टॅक्नाॅलाॅजीबद्दल माहिती नसल्याने त्यांची खिल्ली उडवली गेली। या प्रसंगामुळे त्यांच्यावर मानसिक आघात झाला.
या कथेच्या शेवटी ती प्रसिद्ध करणा-याचे नाव सैय्यद मोहम्मद फहिम असे लिहिले गेले आहे. आम्ही हे नाव फेसबुकवर सर्च केले यात पहिलेच नाव आढळून आले ज्यांनी आपल्या बायोमध्ये शिक्षक असल्याचे म्हटले आहे.
सैय्यद मोहम्मद फहिम यांच्या फेसबुक पेजवर आम्हाला व्हायरल पोस्ट आढळून आली. जी 30 जून रोजी शेअर करण्यात आली आहे.
शिक्षकाला आॅनलाईन त्रास देण्याची कहाणी काल्पनिक
या पोस्टमुळे स्पष्ट झाले की , फहिम यांनी एक काल्पनिक कथा लिहिली होती. शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसाठी किती मेहनत करतात आणि विद्यार्थ्यांनी त्यांना अशा प्रकारे त्रास देऊ नये, हा या कथेचा उद्देश होता फहीम यांच्या बायोनुसार ते बांग्लादेशमधील रहिवाशी आहेत.
या पोस्ट संदर्भात आम्ही फहिम यांच्याशी थेट संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,
“ही कहाणी मी एक व्हिडिओ पाहिल्यानंतर लिहिली होती. त्या व्हिडिओत काही विद्यार्थी आॅनलाईन क्लासदरम्यान शिक्षकाशी चुकीचे पद्धतीने बोलत होतो. त्या शिक्षकाची स्थिती पाहून मी भावूक झालो. त्यामुळेच मी ही कहाणी लिहिली. कहानी शेवटी मी ती काल्पनिक असल्याचे नमूद देखील केले। माझी पोस्ट अपलोड केल्यानंतर मला समजले की माझी ही कहानी इंस्टाग्रामवर देखील शेअर केली जात आहे. मी कोणताही फोटो किंवा व्हिडिओ आपल्या कहाणीसोबत पोस्ट केलेला नाही. मात्र भी भावूक झाल्याने ही कहानी लिहिली होती”.
फहीम यांनी ती लिंक पाठवली जो व्हिडिओ बघून त्यांनी ही कहानी लिहिली होती. हाच तो व्हिडिओ आहे जो फहीम यांच्या कहानी सोबत शेअर केला जात आहे. फहीम यांनी सांगितले की, हा व्हिडिओ बांग्लादेशमधीलच आहे.
माध्यमांनी सोशल मीडियात व्हायरल काल्पनिक कहाणीला सत्य म्हणून प्रसिद्ध केले
यावरुन हेच स्पष्ट होते की, प्रतिष्ठित माध्यमांनी जी खरी कहानी समजून प्रसिद्ध केली जी एक काल्पनिक कथा आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर देखील खूप शेअर केला जात आहे. यात tedthestoner नावाच्या प्रोफाईलचा देखील समावेश आहे.
निष्कर्ष
यावरुन हेच स्पष्ट होते की प्रतिष्ठित माध्यम संस्थांनी एक काल्पनिक कथा खरी समजून प्रसिद्ध केली आणि लोकांपर्यंत पोहचवली.
Source
- Loksatta
- India Today
Result: False/Fabricated
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.