Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkसोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाचा खोटा दावा व्हायरल

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर हिंदीने केले असून हा लेख अर्जुन देवडिया याने लिहिला आहे.

Claim

सोशल मीडियावर असा दावा केला जातोय की, विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांचे निधन झाले. राजू यांना १० ऑगस्ट रोजी वर्कआउट करतांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल केले. आता फेसबुकवर राजू श्रीवास्तव यांच्या निधनाच्या पोस्ट शेअर केल्या जात आहे.

Fact Check

राजू श्रीवास्तव यांच्या निधानाचा दावा खोटा आहे. न्यूजचेकरने १६ ऑगस्ट २०२२ रोजी याची पुष्टी त्यांची मुलगी अंतरा श्रीवास्तव यांनी केली. अंतराने आम्हांला सांगितले की, त्यांच्या वडिलांची प्रकृती स्थिर आहे आणि ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. १३ ऑगस्ट २०२२ रोजी राजू श्रीवास्तव यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवरून त्यांच्या निधनाची बातमी अफवा असल्याचे सांगितले आहे. 

Instagram will load in the frontend.

या व्यतिरिक्त राजू श्रीवास्तव यांच्या स्वीय सचिव गर्वित नारंग यांनी १६ ऑगस्टला वृत्तसंस्था एएनआयला सांगितले की, राजू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्याचबरोबर अभिनेता शेखर सुमन यांनी राजू श्रीवास्तव यांच्या कुटुंबीयांचा हवाला देत सांगितले की, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. अशा पद्धतीने हे स्पष्ट झळव की, राजू श्रीवास्तव यांच्या निधानाचा केला जाणारा दावा खोटा आहे.

अमर उजालाच्या आजच्या बातमीनुसार, राजू यांचे बिझनेस मॅनेजर नयन सोनी यांनी पीटीआयला सांगितले की, राजू यांची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. ते उपचारांना प्रतिसाद देत आहे. त्यांची प्रकृती सुधारत असून त्यांच्या शरीराचे अवयव थोडेसे हलवत आहे. ते आता आयसीयुच्या व्हेंटिलेटरवरच आहे. त्याला शुद्धीवर येण्यासाठी एक आठवडा लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

Result : False

जर तुम्हांला माझी तथ्य पडताळणी आवडत असेल तर असेच विविध लेख या दुव्यावर टिचकी मारून तुम्ही वाचू शकता.


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular