Sunday, April 28, 2024
Sunday, April 28, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये...

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

खोटी माहिती, दावे आणि बातम्यांची बरसात मागील आठवड्यातही सोशल मीडियावर सुरूच राहिली. काँग्रेसच्या बैठकीत चोर ग्रुप असे लिहिलेला बॅनर लावण्यात आल्याचा दावा करण्यात आला. वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले असा दावा वाढीव पावसाच्या पार्श्वभूमीवर व्हायरल झाला. रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, नव्या भारतात रेल्वेला धक्का मारून सुरु करावे लागत आहे. असे दावे करण्यात आले. चांद्रयान-३ च्या उड्डाणाचे विमानातून चित्रित केलेले व्हिडीओ म्हणून दावे व्हायरल झाले. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

लोकांनी धक्के देऊन ट्रेन सुरू केली का?

लष्कराचे जवान, प्रवासी आदींनी धक्का देऊन ट्रेन सुरू केली, त्यानंतर ट्रेन पुढे सरकली. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा संदर्भ बदलून दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

रहदारी नियम उल्लंघनासाठी १०० पेक्षा जास्त दंड नाही?

रहदारी भंग केल्यास सर्व गुन्ह्यांना फक्त १०० रुपये दंड असून यापेक्षा जास्त दंड स्वीकारण्याचा पोलिसांना अधिकार नाही, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

लाटांमध्ये कुटुंब वाहून जात असल्याचे दाखवणारा व्हिडिओ मुंबईच्या बँडस्टँडचा नाही

वांद्रे बॅंडस्टँड येथे दोघांचा बुडून मृत्यू झाला. असा दावा करण्यात आला. आम्ही केलेल्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

चांद्रयान 3 चे प्रक्षेपण दर्शविणारे व्हिडीओ भलतीकडचेच

विमानातील प्रवाशांनी रेकॉर्ड केलेले चांद्रयान 3 चे प्रक्षेपण दर्शविणारे व्हिडिओ असे सांगत दावे करण्यात आले. आमच्या तपासात हे दावे खोटे असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: चोर ग्रुपची बैठक, बॅण्डस्टॅण्डवर दोघे बुडाले, रहदारी भंगास १०० रुपये दंड आणि इतर प्रमुख फॅक्टचेक

चोर ग्रुप बॅनरचा फोटो एडिटेड

काँग्रेसच्या बैठकीत बॅनरवर कोअर ग्रुप ऐवजी चोर ग्रुप असे लिहिण्यात आले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात व्हायरल फोटो खरा नसल्याचे स्पष्ट झाले.


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular