Authors
मागील आठवड्यातही सोशल मीडियावर खोट्या माहितीचा पाऊस पडला. हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला, असा दावा झाला. मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून खर्च फक्त ₹5000 आहे, असा दावा करण्यात आला. मार्गारेट लॉरेन्स नामक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1908 मध्ये दोषी ठरल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगवास घडला होता, असा दावा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू आणि गांधींनी चटकन सत्ता मिळवण्याच्या लालसेने इंग्रजांशी सत्ता हस्तांतरणाचा करार केला आणि ब्रिटनच्या राणीला पेन्शन देण्याचे मान्य केले. असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्याचे फॅक्टचेक आपल्याला या रिपोर्टमध्ये पाहता येतील.
जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत फक्त ₹5000 मध्ये?
मुंबईच्या जे. जे. हॉस्पिटलमध्ये नवीन अँजिओग्राफी पद्धत सुरु झाली असून खर्च फक्त ₹5000 आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले.
हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला?
हिंदू संत व्हिडिओत महिलांसोबत आक्षेपार्ह अवस्थेत पकडला गेला, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
सावरकर 1908 मध्ये बलात्काराच्या प्रयत्नासाठी दोषी ठरले नाहीत
मार्गारेट लॉरेन्स नामक महिलेवर बलात्काराचा प्रयत्न केल्याप्रकरणी 1908 मध्ये दोषी ठरल्याने स्वातंत्र्यवीर सावरकरांना तुरुंगवास घडला होता, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि बदनामी करणारा असल्याचे उजेडात आले.
सत्ता हस्तांतरण करारानुसार ब्रिटनच्या राणीला दिली जाते पेन्शन?
स्वातंत्र्याच्या वेळी नेहरू आणि गांधींनी चटकन सत्ता मिळवण्याच्या लालसेने इंग्रजांशी सत्ता हस्तांतरणाचा करार केला आणि ब्रिटनच्या राणीला पेन्शन देण्याचे मान्य केले. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in