Authors
Claim
व्हायरल इमेजमध्ये प्रतिमा NEET-UG पेपर लीक प्रकरणाचे लाभार्थी असून ते सर्व मुस्लिम विद्यार्थी आहेत, अशा प्रकारे “NEET जिहाद” झाल्याचे सिद्ध होते.
Fact
व्हायरल वृत्तपत्र क्लिपिंग ही केरळ येथील कोचिंग सेंटरने NEET मध्ये उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणाऱ्या जाहिरातीची आहे, ज्याचा सध्याच्या पेपर लीक प्रकरणाशी कोणताही संबंध नाही.
NEET-UG पेपर-लीक प्रकरणात अनेक अटकेच्या पार्श्वभूमीवर, वार्षिक परीक्षेत ‘मुस्लिम नेक्सस’ आणि ‘परीक्षा जिहाद’ असा आरोप करणारे नरेटिव्ह सध्या सोशल मीडियावर चर्चेला आले आहे.
याच नरेटिव्हचा भाग म्हणून अनेक विद्यार्थ्यांचे फोटो दर्शविणारी एक कथित वर्तमानपत्र क्लिपिंग, केवळ मुस्लिम समुदायाशी संबंधित दर्शवून, सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे आणि युजर्सनी असा दावा केला आहे की पेपर लीकचे “लाभार्थी” सर्व मुस्लिम विद्यार्थी होते. इतर अनेक युजर्सनी असाही आरोप केला की या प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व मुस्लिम समुदायाचे आहेत. सीबीआयने झारखंड शाळेच्या मुख्याध्यापक आणि उपमुख्याध्यापकांच्या केलेल्या अटकेकडे लक्ष वेधून पेपर लीकमागे एक संघटित “मुस्लिम” संबंध असल्याचे हे दावे सांगतात.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
NEET-UG पेपर लीक प्रकरण
2024 NEET-UG परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे भारतभरात MBBS, BDS आणि इतर संबंधित अंडरग्रेजुएट वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी आयोजित करण्यात आली होती, ज्यामध्ये प्रश्नपत्रिका फुटणे, फुगवलेले मार्किंग आणि मनमानी ग्रेस मार्क्स आदी गंभीर प्रश्नांवर लक्ष वेधले गेले. सध्या राजकीय पक्षांसाठी देशव्यापी फ्लॅशपॉईंट बनलेल्या या समस्येसाठी हजारो विद्यार्थी आणि राजकीय पक्ष अनेक आठवडे आंदोलन करत आहेत.
Fact Check/ Verification
NEET घोटाळ्याच्या चौकशीत फक्त मुस्लिमांनाच अटक करण्यात आली होती का?
न्यूजचेकरला असे आढळून आले की NEET पेपर लीक प्रकरणातील आरोपींमध्ये हिंदू समुदायातील लोकांचाही समावेश होता, यामुळे या प्रकरणात मुस्लिम संबंधाच्या व्हायरल दाव्याचे खंडन होते. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीबीआयने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे, बहुतेक आरोपींनी चौकशीदरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार संजीव मुखियाचे नाव घेतले आहे.
केवळ मुस्लिम विद्यार्थी उच्च गुण मिळवले असल्याच्या व्हायरल चित्रामागील वस्तुस्थिती काय आहे?
न्यूजचेकरने आपल्या तपासादरम्यान व्हायरल पोस्टच्या कॉमेन्टमध्ये लक्ष दिले, जिथे युजर्सनी निदर्शनास आणले की जाहिरात मल्याळम दैनिक, मातृभूमीमध्ये दिसली होती. युनिव्हर्सल इन्स्टिट्यूट, कोट्टाक्कल, केरळने दिलेली ही जाहिरात NEET 2024 मध्ये उच्च क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणारी असून ती 6 जून 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आम्ही स्पष्टपणे पाहू शकतो की या समूहात, जरी प्रामुख्याने मुस्लिमांचा समावेश होता, परंतु इतर समुदायातील विद्यार्थी देखील आहेत. संस्थेच्या वेबसाइटनेही हीच जाहिरात शेअर केली आहे.
त्यानंतर आम्ही संस्थेचे प्राचार्य कॅप्टन डॉ अब्दुल हमीद यांच्याशी संपर्क साधला, त्यांनी सांगितले, “वृत्तपत्र क्लिपिंग युनिव्हर्सल इन्स्टिट्यूट, कोट्टाक्कलच्या जाहिरातीची आहे, जी अनेक वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झाली होती. जाहिरातीमध्ये आमच्या संस्थेतील विद्यार्थी आहेत, ज्यात विविध समुदायातील विद्यार्थी देखील आहेत. मलप्पुरम जिल्ह्यातील कोट्टाक्कल हा मुस्लिमबहुल भाग आहे, त्यामुळे स्वाभाविकपणे बहुतांश विद्यार्थी त्या समाजातील आहेत. तसेच, यातील काही विद्यार्थी या NEET परीक्षांचा वर्षानुवर्षे प्रयत्न करत आहेत, त्यासाठी कठोर परिश्रम घेत आहेत, त्यामुळे त्यांना पेपर लीक घोटाळ्याशी जोडणे दुर्दैवी आहे.”
2011 च्या जनगणनेनुसार, मलप्पुरम जिल्ह्यात मुस्लिम (68.53%) बहुसंख्य लोकसंख्या आहे, त्यानंतर हिंदू (29.17%) आणि ख्रिश्चन (2.22%) समुदाय आहेत हे आम्हाला निदर्शनास आले.
NEET घोटाळ्याच्या लाभार्थ्यांची कोणतीही सार्वजनिक माहिती उपलब्ध नाही, व्हायरल दावा निराधार
आम्हाला NEET पेपर लीक घोटाळ्याचे “लाभार्थी” उघड करणारे कोणतेही वृत्त, रिपोर्ट किंवा अधिकृत विधाने आढळली नाहीत. संस्थेचे नाव तपासात समोर आलेले नाही, तर केरळमध्ये अद्याप NEET अनियमिततेची कोणतीही प्रकरणे नोंदवली गेली नाहीत, ज्यामुळे व्हायरल झालेल्या सांप्रदायिक आरोपाचा दावा खोटा असल्याची पुष्टी होते.
Conclusion
NEET पेपर लीक घोटाळ्याचे मुस्लिम लाभार्थी दाखविण्याचा दावा करणारी व्हायरल वृत्तपत्र क्लिपिंग प्रत्यक्षात केरळ कोचिंग सेंटरच्या जाहिरातीची आहे ज्यांनी NEET 2024 मध्ये उच्च गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. यादीमध्ये इतर समुदायातील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.
Result: False
Sources
Mathrubhumi e-paper
Universal Institute, Kottakkal website
Conversation with Captain Dr Abdul Hameed, principal, Universal Institute
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर इंग्रजीसाठी कुशल एच. एम. यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा