Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeCoronavirusमुंबईत कोरोनाच्या बहाण्याने मानवी अवयवांची तस्करी? जाणून घ्या सत्य

मुंबईत कोरोनाच्या बहाण्याने मानवी अवयवांची तस्करी? जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

मुंबईत कोरोनाच्या नावावर मानवी अवयवांची तस्करी होत असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. याबाबत एक पोस्ट शेअर होत असू यात म्हटले आहे की, कोरोनाच्या नावावर नविन घोटाळा होत आहे. भायंदरच्या गोराई येथीलमध्ये एकही कोरानाचा रुग्ण नव्हता. एक व्यक्ती फक्त सर्दी आणि खोकला येत असल्याने चेकअप करायला गेला तर त्याला कोरोना झाल्याचे सांगण्यात आले. त्याला जबरदस्तीने अॅडमिट करण्यात आले. रात्री त्याचा मृत्यू झाला. त्याचे पार्थिव करुन अंत्यविधी करण्याचे प्रयत्न चालू होते.

नातेवाईंकानी पॅक बाॅडी उघडण्यास डाॅक्टरांना भाग पाडले असता मृताच्या शरीरातील सर्व अवयव काढून घेण्यात आल्याचे आढळून आले. महाराष्ट्रात कोरोना मृत शरीर घोटाळा उघडकीस आला आहे. असं किती लोकांच्या बाबतीत घडलं आहे हे मात्र माहित नाही.

मुंबईत कोरोनाच्या नावावर मानवी अवयवांची तस्करी होत असल्याचा दावा
व्हायरल फोटो

Fact Check / Verification

आम्ही व्हायरल दाव्याची पडताळणी करत असताना फेसबुकवर आम्हाला याच आशयाची पोस्ट आढळून आली. ज्यात व्हायरल फोटो देखील शेअर करण्यात आला होता. ही पोस्ट हिंदीत आहे मात्र यातील दावे तेच आहेत.

https://www.facebook.com/story.php?story_fbid=3574303335947098&id=100001024007078

संग्रहित

ही पोस्ट टविटर आणि फेसबुकवर देखील व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

https://twitter.com/muftiwahidsdy/status/1285459014940164096
https://www.facebook.com/Pressofhindustan/posts/173308350835252
https://www.facebook.com/shivamGURJAR420/posts/2683649581956874

या पोस्टमध्ये हाॅस्पिटलचे नाव आणि मृत व्यक्तीचे नाव देखील दिले नसल्याने शंका निर्माण झाली. माध्यमांत याविषयी बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत का याचा देखील शोध घेतला मात्र मुंबईत कोरानाच्या आडून मानवी अवयवांची तस्करी होत असल्याची एकही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही पोस्ट बारकाईने वाचली असता पोस्टच्या शेवटी ओम शुक्ला दिल्ली क्राइम प्रेस असे नाव लिहिलेले आढळून आले. याविषयी अधिक माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला आज तक हिंदी बातम्यांच्या वेबसाईटवर याबाबत माहिती मिळाली. ओम शुक्ला हा दिल्ली क्राइम प्रेसच्या रिपोर्टर असून त्याने ही बातमी शहानिशा न करता छापली असे त्याने आज तकच्या प्रतिनिधील सांगितले आहे. शुक्ला याने व्हायरल फोटो हा लखनौमधील असल्याचे सांगितले. यावरुन हे स्पष्ट झाले की हा व्हायरल फोटो मुंबईतील नाही.

गोराईमध्ये खरंच अशी घटना घडली आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता आम्हाला नवभारत टाईम्सची एक बातमी आढळून आली. यात म्हटले आहे की गोराईमध्ये होम कोरंटाईन करण्यास आलेल्या सरकारी कर्मचा-यांना अंग तस्कर समजून गावकरी त्यांच्या अंगावर धावून गेले. त्यांना मारहाण करु लागले. पोलिस वेळीच तेथे पोहचले शिवाय स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी देखील लोकांना समजविले.

नवभारत टाईम्स बातमी
नवभारत टाईम्सची बातमी

मुंबई उत्तर विभागाचे अतिरिक्त पोलिस आयुक्त दिलीप सावंत यांनी देखील माध्यमांशी बोलताना सांगितले की, गोराईमध्ये मानवी अवयवांची तस्करीचा दावा खोटा आहे. अशा प्रकारची कोणतीही घटना उघडकीस आलेली नाही.

Conclusion:

यावरुन हेच स्पष्ट होते की, गोराईमध्ये कोरोनाच्या नावावर मानवी अवयवांची तस्करी होत असल्याचा दावा खोटा आहे, व्हायरल पोस्टमधील फोटो हा मुंबईतील नसून तो उत्तरप्रदेशातील लखनौमधील आहे. सोशल मीडियात तो चुकीच्या दाव्याने व्हायर झाला आहे.

Result: False

Our Sources:

https://navbharattimes.indiatimes.com/metro/mumbai/other-news/rumor-of-human-body-smuggling-in-the-name-of-corona-health-workers-mumbai/articleshow/76994202.cms
https://mumbaipolice.gov.in/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.


Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular