Monday, April 29, 2024
Monday, April 29, 2024

HomeFact CheckFact Check: तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला? जाणून घ्या सत्य...

Fact Check: तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Believing in the notion of 'live and let live’, Preeti feels it's important to counter and check misinformation and prevent people from falling for propaganda, hoaxes, and fake information. She holds a Master’s degree in Mass Communication from Guru Jambeshawar University and has been a journalist & producer for 10 years.

Claim
तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला असून मुलांच्या अवयवांचा व्यापार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Fact
व्हायरल दावा ही अफवा आहे. प्रत्यक्षात सीरिया येथील २०१३ मधील केमिकल हल्ल्याच्या घटनेतील फोटो व्हायरल केला जात आहे.

तामिळनाडू पोलिसांना एक कंटेनर भरून मुलांचे मृतदेह सापडले असून लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराचा प्रकार उघडकीस आला आहे. असे सांगणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे. संबंधित संदेश एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात असून व्हिडिओत व्हाईस ओव्हर आणि एका छायाचित्राचा वापर करण्यात आला आहे.

Fact Check: तामिळनाडूत सापडला मृतदेहांचा कंटेनर आणि लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराच्या अफवाच, प्रक्षोभक ऑडिओ क्लिपसह सीरियातील फोटो होताहेत शेयर
(संवेदनशील चित्रे असल्याने मूळ छायाचित्र ब्लर करण्यात आले आहे.)

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: तामिळनाडूत सापडला मृतदेहांचा कंटेनर आणि लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराच्या अफवाच, प्रक्षोभक ऑडिओ क्लिपसह सीरियातील फोटो होताहेत शेयर

व्हायरल होत असलेल्या दाव्यामध्ये एका पुरुषाच्या आवाजात ऑडिओ क्लिप जोडण्यात आली आहे. तो आवाज पुढीलप्रमाणे संदेश देतो. “तमिलनाडू पुलिस को एक कनटेनर से बच्चों की लाश मिली, इन बच्चों के जिस्म के अन्दर का हिस्सा निकाला गया है, जैसे किडनी, लीवर। तमिलनाडू पुलिस ने बताया इन सारे बच्चों को अलग अलग देशों से किडनैप करके लाया गया है ..नोट:-अपने घर के बच्चों को सम्भालो, उनका ख्याल रखो, अपने सारे ग्रुप मे ये मैसेज सेन्ड करो। इस फोटो को इतना फैलाओ ताकि कुत्ता पकड़ा जाना चाहिए। अगर जिसने ये नहीं फैलाया वो अपनी माँ का सपूत नहीं। अपने फोन में चाहे कितने भी ग्रुप हो 1, 2 , 3, 4 या 25, ये सारे ग्रुप मे भेजो, हरामखोर पकड़ा जाना चाहिए।”

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास लावण्यासाठी आम्ही संबंधित व्हिडिओत वापरण्यात आलेल्या छायाचित्रावर रिव्हर्स इमेज शोध घेतला. आम्हाला aljazeera ने २१ ऑगस्ट २०१३ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली. ज्यामध्ये व्हिडीओ रिपोर्टसुद्धा जोडण्यात आलेला आहे.

Fact Check: तामिळनाडूत सापडला मृतदेहांचा कंटेनर आणि लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराच्या अफवाच, प्रक्षोभक ऑडिओ क्लिपसह सीरियातील फोटो होताहेत शेयर
Screengrab of Aljazeera

आम्हाला सापडले संबंधित मृत्यू प्रकरण आणि शेकडो मुले आणि नागरिकांचे मृतदेह पसरण्याचे हे प्रकरण सीरियन गृहयुद्धादरम्यान ऑगस्ट २०१३ मध्ये घौटा, सीरिया येथे झालेल्या रासायनिक हल्ल्याशी संबंधित आहे, ज्यामध्ये दमास्कसच्या उपनगरांना रासायनिक एजंट सरिन असलेल्या रॉकेटने लक्ष्य केले गेले.

यावरून सुगावा घेऊन आणखी शोध घेतला असता आम्हाला २२ ऑगस्ट २०१३ मध्ये प्रसिद्ध झालेला cbrainard हा एक ब्लॉग सापडला. सीरियामध्ये २०१३ मध्ये घडलेल्या त्या घटनेची माहिती देताना व्हायरल व्हिडिओमध्ये वापरले जात असलेले छायाचित्र या ब्लॉगमध्ये स्वतंत्रपणे वापरण्यात आले आहे.

Fact Check: तामिळनाडूत सापडला मृतदेहांचा कंटेनर आणि लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराच्या अफवाच, प्रक्षोभक ऑडिओ क्लिपसह सीरियातील फोटो होताहेत शेयर
Screengrab of cbrainard

पुढील तपासात आम्हाला अमेरिकन फॅक्ट-चेकिंग वेबसाइट स्नोप्सने ६ डिसेंबर २०१६ मध्ये याच संदर्भातील फॅक्टचेक केला असल्याचे निदर्शनाला आले. थायलंडमध्ये अवयव तस्करीच्या खोट्या कथनासह संबंधित फोटो तेंव्हा शेअर केला जात होता. अशी माहिती आम्हाला मिळाली.

Fact Check: तामिळनाडूत सापडला मृतदेहांचा कंटेनर आणि लहान मुलांच्या अवयवांच्या व्यापाराच्या अफवाच, प्रक्षोभक ऑडिओ क्लिपसह सीरियातील फोटो होताहेत शेयर
Screengrab of Snopes

२०१३ मध्ये सीरियन सिव्हिल युद्धा दरम्यान झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या दुःखद परिणामाचे चित्रण करणारे छायाचित्र जोडून चुकीचा दावा करण्यात येत असल्याचे यावरून स्पष्ट झाले.

Conclusion

यावरून आमच्या तपासात शेवटी, तामिळनाडू पोलिसांना एका कंटेनरमध्ये हरवलेल्या मुलांचे मृतदेह सापडले आणि हा अवयवांची तस्करी करण्याचा प्रकार असल्याचा दावा खोटा आहे. २०१३ मध्ये सीरियन सिव्हिल युद्धा दरम्यान झालेल्या रासायनिक हल्ल्याच्या दुःखद परिणामाचे चित्रण करणारे छायाचित्र जोडून चुकीचा दावा करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले.

Result: False

Our Sources
News published by Aljazeera on Audust 21, 2013
Blog published by cbrainard on August 22, 2013
Factcheck published by Snopes on December 6, 2016

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Believing in the notion of 'live and let live’, Preeti feels it's important to counter and check misinformation and prevent people from falling for propaganda, hoaxes, and fake information. She holds a Master’s degree in Mass Communication from Guru Jambeshawar University and has been a journalist & producer for 10 years.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular