Thursday, December 12, 2024
Thursday, December 12, 2024

HomeFact Checkराणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात...

राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे?

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

मुंबईतील राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. राणीची बाग या नावानं वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयाला ओळखले जाते पण आता याचे नाव बदलण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. व्हायरल होणाऱ्या पोस्टमधील फोटोत हजरत अली पीर बाबा राणी बाग असं लिहिण्यात आलेली एक पाटी दिसते. 

फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट
फेसबुक पोस्टचा स्क्रिनशाॅट

Fact Check/ Verification

मुंबईतील राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे का याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी काही किवर्डच्या आधारे शोध सुरु ठेवला असता. आम्हाला विकिपीडियावर माहिती मिळाली, यात “वीर जिजाबाई भोसले उद्यान तथा राणीचा बाग ही मुंबईतील सर्वात जुनी आणि मोठी बाग आहे. हिचे मूळचे नाव क्वीन व्हिक्टोरिया गार्डन्स होते. ही बाग भायखळा येथे असून 53 एकर परिसरात पसरलेली आहे. देशातले सर्वात जास्त वनस्पतिवैविध्य या बागेत आहे. या बागेचे उद्‌घाटन 19 नोव्हेंबर 1862 रोजी लेडी कॅथरीन फ्रेअर यांनी केले आणि लगेच ती बाग जनतेसाठी खुली झाली.” असे म्हटले आहे.

वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानाचे नाव बदलण्यात आले आहे का याचा शोध आम्ही पुढे सुरुच ठेवला  असता आम्हाला एक फेसबुक पोस्ट आढळून आली, काल दिवसभर राणी बागेच्या नावबदलाबद्दल एक चुकीची व खोडसाळ post social

media वर फिरतेय, त्याबदद्ल स्पष्टीकरण

राणी बागेत एका टोकाला एक दर्गा आहे. त्याचं नाव हसरत हाजी पीर बाबा राणीबागवाले असं आहे. हा दर्गा राणीबागेच्या स्थापनेपासूनच म्हणजे 1861 सालापासून तिथे आहे. जो बोर्ड फोटोत दिसतोय तो बोर्ड फक्त दर्ग्याची जागा दाखवणारा दिशादर्शक बोर्ड आहे. (कृपा करून Zoom करून पहावे.) त्या बोर्ड वर ‘राणीबागवाले’ ऐवजी चुकून ‘राणीबाग’ असं लिहिलं गेलं आहे. हा बोर्ड सुमारे चार वर्षांपूर्वी राणीच्या बागेतील सुशोभीकरण करताना लावला गेलेला आहे. राणी बागेचं नाव पूर्वी व्हिक्टोरिया गार्डन्स असं होतं. आता ते वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालय असे आहे.

याशिवाय lokmattimes.com वर 22 डिसेंबर 2021 रोजीची बातमी आढळून आली. याच म्हटले आहे की, “महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, उद्यानाचे नाव बदलण्यात आल्याचे दावे खोटे असून या उद्यानात हजरत अली पीर बाबा यांचा दर्गा आधीपासून आहे. या दर्ग्यात हिंदु-मुस्लीम दोघंही ऐक्य भावनेने माथा टेकतात. ऐक्याचं प्रतिक म्हणून याकडे पाहिले जाते. काही समाजकंटक अशाप्रकारे फोटो व्हायरल करुन विनाकारण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्यानाचे नाव वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणी संग्रहालय आहे आणि भविष्यात राहील. हे नाव बदलण्याची कुणाची हिंमत नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.”

Mymahnagar च्या बातमी आढळली ज्यात म्हटले आहे की, भायखळा येथील पालिकेच्या उद्यानाचे नाव ‘राणी बाग’ नसून ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ असे आहे. पूर्वीच्या काळापासून लोक या उद्यानाला ‘राणीबाग’ या नावाने संबोधत आले आहेत. या उद्यान परिसरातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे, त्यामुळे उद्यानाचे नाव बदललेले नाही, असा खुलासा प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी केला आहे.

हे देखील वाचा- पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएएस आरती डोगरांच्या पाया पडले?

Conclusion: 

आमच्या पडताळणीत आढळले की, भायखळा येथील पालिकेच्या उद्यानाचे नाव ‘वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय’ असे आहे. ते बदलले नाही. या उद्यान परिसरातील जुन्या दर्ग्याचे नाव ‘हजरत हाजी पीर बाबा राणीबाग’ असे पडले आहे.

Result: Misleading

Sources:

Media Reports:

Lokmat Times

My Mahanagar


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular