Wednesday, July 17, 2024
Wednesday, July 17, 2024

HomeFact Checkवरातीत नाचल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांचा नाही, चुकीचा दावा व्हायरल

वरातीत नाचल्याचा व्हिडिओ संजय राऊत यांचा नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

शिवसेनेचे प्रवक्ते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांचा लग्नाच्या वरातीत नाचल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून, दावा करण्यात येत आहे की काही वर्षापूर्वी वरातीत नाचणारे राऊत आता स्वत: ला शिवाजी महाराजांचे वारशाचे ठेकेदार म्हणवतात. व्हिडिओत संजय राऊत यांच्या सारखी दिसणारी व्यक्ती बाॅलीवुडच्या गाण्यावर नाचताना दिसत आहे.

संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल व्हिडिओ शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचाच आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध सुरु केला असता आम्हाला सरकारनामा च्या फेसबुक पेजवर व्हायरल व्हिडिओ आढळून आला. हा व्हिडिओ डिसेंबर 2019 मध्ये अपलोड करण्याच आला आहे. यात म्हटले आहे की, “शिवसेनेचे फायर ब्रॅन्ड नेते खासदार संजय राऊत यांच्यांशी साधर्म्य असलेले परभणीचे लक्ष्मण भदरगे (डुप्लीकेट संजय राऊत) यांचा ” घुंगरू पैंजणांच, पायात वाजंत ‘, हे गीत आणि त्यावर त्यांनी केलेला भन्नाट डान्स सध्या राज्यभरात गाजतोय. राज्यातील सत्ता स्थापनेत महत्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे नेते संजय राऊत यांचे नाव सध्या देशभरात चर्चिले जात आहे. अशावेळी परभणीचे पोलीस कर्मचारी लक्ष्मण भदरगे यांचा हा व्हिडिओ चांगलाच भाव खात आहे. संजय राऊत यांच्यासारखीच देहबोली, केसांची रचना, डोळ्यावरचा चष्मा पाहून हा व्हिडिओ पाहणारे देखील चकित होत आहेत”.

https://www.facebook.com/watch/?v=662363014590094&extid=ryMKM1yb66tWFCNw

सरकारनामाच्या फेसबुवर पेज वरील माहितीवरुन हे समजले की लग्नाच्या वरातीत नाचणारे संजय राऊत नसून त्यांच्या सारखे दिसणारे परभणीतील पोलिस कर्मचारी आहेत मात्र त्या पोलिस कर्मचा-याने नेमका कधी डान्स केला याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. या शोधा दरम्यान आम्हाला महाराष्ट्र देशा या वेबसाईटवर बातमी आढळून आली. ज्यात राऊत यांच्या सारखे दिसणारे पोलिस कर्मचारी लक्ष्मण भदरगे यांचा सेलू येथील लग्नात डान्स केल्याचा व्हिडिओ एका मुलाने शूट केला व महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या दरम्यान सोशल मीडियात व्हायरल केला.

याशिवाय सरकारनामाची बातमी आढळून आली. ज्यात परभणीच्या संजय राउतांनी ( पोलिस कर्मचारी लक्ष्मण भदरगे) सोशल मीडियात धुमाकूल घातल्याचे म्हटले आहे.

conclusion

यावरुन हेच सिद्ध होते की संजय राऊत यांनी बाॅलीवुड किंवा मराठी गाण्याच्या तालावर लग्नात डांस केलेला नाही. त्यांच्या सारखे दिसणारे पोलिस कर्मचारी लक्ष्मण भदरगे यांच्या डांसचा व्हिडिओ संजय राऊतांच्या नावाने व्हायरल झाला आहे.

Result- False

Sources

सरकारनामा- https://www.sarkarnama.in/sanjay-bhadarge-and-his-vidio-46432

महाराष्ट्र देशा- https://maharashtradesha.com/parbhanis-sanjay-raut/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular