Wednesday, February 21, 2024
Wednesday, February 21, 2024

HomeFact CheckHealth and Wellnessल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो? या व्हिडिओचे सत्य...

ल्युपो कंपनीच्या केकमध्ये गोळ्या सापडल्याने लहान मुलांना अर्धांगवायू होतो? या व्हिडिओचे सत्य जाणून घ्या

याचे फॅक्ट चेक न्यूजचेकर गुजरातने केले असून हा लेख प्रथमेश खुंट याने लिहिला आहे.

अन्नाच्या भेसळीबाबतचे अनेक दावे सोशल मीडियावर अनेकदा पाहायला मिळतात. त्यातच आता एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, ल्युपो नावाचा केक बाजारात आला असून त्यात एक गोळी आढळते. त्या गोळीमुळे लहान मुलांना अर्धांगवायू होतो.

पुसद चालू घडामोडी या फेसबुक युजरने हा व्हिडिओ शेअर करत त्यात लिहिलंय की,”नवीन केक बाजारात आला आहे. ल्युपो कंपनीचा एक टॅबलेट आहे जो लहान मुलांना अर्धांगवायू करतो, कृपया हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा तो सध्या बाजारात विकला जातोय. तुमच्या मुलांची काळजी घ्या आणि स्वतःचीही काळजी घ्या.” फेसबुकवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

फोटो साभार : Facebook/पुसद चालू घडामोडी
फोटो साभार : Facebook/Sudhir Ajagekar

ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे वाचू शकता.

न्यूजचेकरला (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर हा दावा एका युजरने तथ्य पडताळणीसाठी पाठवला आहे.

व्हाट्स अॅप नंबरवर पाठवलेला दावा

Fact Check / Verification

या व्हिडिओची पडताळणी करण्यासाठी आम्ही ‘ल्युपो चॉकलेट’ असं गुगलवर टाकून शोधले. तेव्हा आम्हांला ल्युपो चॉकलेट खाल्ल्याने अर्धांगवायू होतो, या संबंधितचे काही फॅक्ट चेक आढळून आले. याचे फॅक्ट चेक २०१९ आणि २०२१ मध्ये केले होते.

एक वर्षापूर्वी तुर्कीतील फॅक्ट चेक करणाऱ्या teyit या संकेतस्थळाने या घटनेवर संशोधन अहवाल प्रकाशित केला होता. त्या अहवालानुसार, हा व्हिडिओ पहिल्यांदा ऑक्टोबर २०१९ मध्ये शेअर करण्यात आला होता. या व्यतिरिक्त हा व्हिडिओ इराकी यु ट्यूब वाहिनी wishe press ने पोस्ट केला होता. तसेच व्हिडिओमध्ये Aspilic नावाची वस्तू दिसत आहे, ही कंपनी फ्रोझन फूड बनवते. त्याची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ ही इराक आहे. त्यामुळे हा व्हिडिओ इराकमध्ये काढला असल्याची शक्यता अधिक आहे.

खरेतर व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सोलेन चॉकलेट ब्रँड आणि त्याचे पॅकेजिंग असलेल्या वस्तू तुर्कीच्या बाजारात विकले जात नाही. कंपनी याचे उत्पादन फक्त निर्यातीसाठी बनवते. सोलेन कंपनी १० पेक्षा जास्त वेगवेगळ्या ब्रॅंडसाठी वस्तू बनवते. सोलेनच्या अधिकृत संकेतस्थळाच्या माहितीनुसार, गझियानटेप आणि इस्तंबूलमधील दोन कारखान्यांमध्ये हे चॉकलेट तयार केले जातात. व्हिडिओमध्ये दाखवलेले केक २००० कामगारांनी गझियानटेपच्या एक लाख वीस हजार चौरस मीटरच्या जागेत बनवले आहे. तसेच सोलेन चॉकलेट १२० देशांमध्ये २०० हून अधिक वस्तू विकते.

ल्युपोबद्दल गुगलवर शोधल्यावर सौदी अरेबियातील ॲमेझॉनचे संकेतस्थळ दिसले. तिथे दिलेल्या माहितीनुसार, सौदी अरेबियामध्ये ल्युपोचे उत्पादन केले जाते.

कंपनीने त्यांच्या व्हिडिओमध्ये ल्युपो चॉको कोकोनट केकची ओळख आणि पॅकेजिंग teyit संकेतस्थळावर शेअर केले आहे. कंपनीने सांगितले की, उत्पादने तयार झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाते आणि निर्यात केलेल्या उत्पादनांची देखील पुन्हा एकदा तपासणी केली जाते. तसेच teyit च्या एका पत्रकाराशी बोलता असताना त्यांना कळले की, पीस स्प्रिंग ऑपरेशननंतर उत्तर इराक आणि तुर्की दरम्यान मालावर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न झाला होता. या व्हिडिओ येण्यामागे बहिष्काराचा एक भागही असू शकतो, असे म्हणता येईल.

या व्यतिरिक्त आम्हांला डिसेंबर २०१९ मध्ये गल्फ न्यूजची बातमी मिळाली. युएईच्या बाजारपेठेत ल्युपो केकचा व्यापार होत नाही, असे दुबई महानगरपालिकेने सांगितले. काही काळापूर्वी भारतात हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यात दावा केला होता की, त्यात नपुंसक बनण्याच्या गोळ्या मुस्लिमांनि त्यात मिसळल्या आहे.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ल्युपो नावाच्या चॉकलेटमध्ये औषधाची गोळी सापडल्याचा दावा केला जाणारा व्हायरल व्हिडिओ ऑक्टोबर २०१९ पासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. सध्या भारतात या चॉकलेटची विक्री होत असल्याच्या बातम्या नाहीत. तसेच ही घटना २०१९ मधील आहे. हा दिशाभूल करणारा व्हिडिओ विविध दाव्यांसह वेगवेगळ्या देशांमध्ये अनेकदा व्हायरल झाला आहे.

Result : Missing Context

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular