Thursday, June 30, 2022
Thursday, June 30, 2022

घरFact CheckHealth and Wellnessचिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते...

चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात खरंच डुक्कराचे मांस टाकले जाते ? जाणून घ्या सत्य काय आहे

सोशल मीडियावर एक संदेश व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, जे डुकराच्या मांसापासून बनवले जाते. 

मागेही फेअर अँड लवली डुक्कराचे तेल वापरले जाते. याची तथ्य पडताळणी आम्ही केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता.

Fact Check/Verification

दावा क्रमांक ३ : चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, जे डुकराच्या मांसापासून बनवले जाते. 

चिप्स, बिस्कीट, च्युइंग गम, टॉफिज, कुरकुरे आणि मॅगी यात ई ६३१ चे वर्धक टाकले जाते, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही सर्वात प्रथम ई ६३१ गुगलवर टाकून त्याविषयी माहिती शोधली. 

त्यावेळी आम्हांला एफएसएसएआय म्हणजेच फूड सेफ्टी अँड स्टँडर्डस ऑथोरिटी ऑफ इंडिया यांची एक पीडीएफ मिळाली. जे भारतातील सर्व खाण्या-पिण्याच्या पदार्थांना परवानगी देते. 

त्यात ई नंबरविषयी सर्व माहिती दिली होती. यात आम्हाला १८७ पानावर ई ६३१ विषयी माहिती आढळून आली. तेव्हा आम्हांला समजले की, ई ६३१ हा ‘चवीसाठी (flavour enhancer)’ साठी वापरतात. यावरून स्पष्ट होते की, ई ६३१ याचा उपयोग फक्त चवीसाठी होतो. त्याचबरोबर आम्हाला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (डब्लूएचओ) या संकेतस्थळावर ई ६३१ म्हणजेच डायसोडियम इनोसिनेटचा वापर food additives आणि flavour enhancer साठी केला जातो, असं स्पष्ट लिहिले आहे.

फोटो साभार : fssai.gov.in
फोटो साभार : World Health Organization

मग आम्ही चिप्सचा कागद पाहिला. त्यावर पुढच्या बाजूला हिरवा ठिपका दिसला. त्याचबरोबर त्याच्या मागच्या बाजूला एफएसएसएआयचा नंबर लिहिलेला आम्हांला आढळून आला. तिथे कुठेही ई ६३१ लिहिलेले आढळले नाही.

फोटो साभार : big basket
फोटो साभार : big basket

आता त्या हिरव्या ठिपक्याचा अर्थ काय आहे, ते आपण समजून घेऊ. फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड लेबलिंग अँड डिस्प्ले २०२० नुसार, हिरव्या भरलेल्या ठिपक्याभोवती हिरव्या रंगाचा चौकोन असेल तर ती वस्तू शाकाहारी आहे, असा त्याचा अर्थ होतो.

फोटो साभार : fssai.gov.in

त्यानंतर आम्ही च्युइंग गमचा कागद पाहिला. त्यावर देखील आम्हांला हिरवा ठिपका आणि एफएसएसएआयचा नंबर लिहिलेला आढळून आला. त्यावर ई १२४ आणि ई १०२ याचा वापर केला आहे. हे रंगासाठी वापरतात. पण यात कुठेही ई ६३१ लिहिलेले नाही.

फोटो साभार : Amazon
फोटो साभार : Amazon

आम्हाला कुरकुरेवर देखील सुद्धा हिरवा ठिपका आणि एफएसएसएआयचा नंबर लिहिलेला दिसला. त्यावर ३३० हा नंबर लिहिला होता. हे सायट्रिक अॅसिड असून ते अॅसिडिटी रेग्युलटरसाथी वापरतात. यावर कुठेही ई ६३१ लिहिलेले नाही.

फोटो साभार : Amazon
फोटो साभार : Amazon

शेवटी आम्ही मॅगीचा कागद पाहिला. त्यावर सुद्धा आम्हांला पुढच्या बाजूला हिरवा ठिपका दिसला. त्याचबरोबर आम्हाला त्यावर ६३५ हा चवीसाठी (flavour Enhancer) वापरले जाते, असं त्याच्या घटकांमध्ये लिहिलेले आढळले. तिथे कुठेही ई ६३१ असं लिहिलेले नाही.

फोटो साभार : big basket
फोटो साभार : big basket

त्याचबरोबर आम्हांला बिजनेस स्टँडर्डचा एक लेख मिळाला. त्यात एफएसएसएआयचे सीईओ पवन अग्रवाल म्हणाले,”मॅगी नूडल्स खाण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे.”

(टीप : या मालिकेत मागे आपण नेस्लेच्या किटकॅट चॉकलेट आणि त्यानंतर फेअर अँड लवलीची तथ्य पडताळणी केली होती. आता आपण एका नव्या भागात भेटू.)

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, ई ६३१ हे फक्त चवीसाठी (flavour enhancer) वापरले जाते पण ते चिप्स, च्युइंग गम, कुरकुरे आणि मॅगी यात कुठेही वापरत नाही.

Result : Fabricated Content/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

Most Popular