बदायू सामूहिक बलात्कार पीडितेचा म्हणून सोशल मीडियावर एका मृत महिलेचा फोटो व्हायरल होत आहे. ही पोस्ट हिंदीत असून यात म्हटले आहे की, बदायू सामूहिक बलात्कार प्रकरण, मंदिरात गेलेल्या 50 वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारानंतर हत्या करण्यात आली. सामूहिक बलात्काराच्या वेळी घडलेल्या भयानक गोष्टी एकून थरकाप उडेल. महंत आणि त्याचे शिष्य दानव निघाले. बदायूं पोलिसांनी हे प्रकरण 2 दिवस लपवून ठेवले. हा माणुसकिला काळिमा आहे.

Fact check / Verification
नुकतेच उत्तरप्रदेशातील बदायू जिल्ह्यात एका 50 वर्षीय महिलेची सामूहिक बलात्कारांनंतर हत्या केल्याची घटना घडली आहे. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना पोलिसांनी दोन दिवस लपपविली असल्याचा आरोप होत आहे. याच दरम्यान सोशल मीडियामध्ये एका महिलेचा फोटो व्हायरल झाला आह दावा कऱण्यात येत आहे का हा फोटो बदायू पीडितेचा आहे. आम्ही हा व्हायरल फोटो बदायू पीडितेचा आहे का याचा शोध घेण्यासाठी रिव्हर्स इमेजचा वापर केला.
या शोधादरम्यान आम्हाला विवेककुमार यादव या यूजरचे 24 सप्टेंबर 2018 रोजी केलेले ट्विट आढळून आले. यात त्याने उत्तरप्रदेशात महिलांवर होत असलेल्या अत्याचाराबाबत भाष्य केले आहे.
अधिक माहिती मिळविण्यासाठी शोध सुरु ठेवला असता आम्हाला बोलता हिंदुस्तान या वेबसाईटवर 25 डिसेंबर रोजी प्रकाशित झालेला लेख आढळून आला. ज्यात म्हटले आहे की, उन्नाव मधील एका 20 वर्षीय युवतीची हत्या करण्यात आली.

या लेखा शिवाय आम्हाला एक ट्विट मिळाले ज्याला युपी पोलिसांनी रिप्लाय दिला आहे. पोलिसांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले, प्रेत पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहे. तपास सुरु केला आहे.
conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की व्हायरल फोटो बदायू घटनेतील पिडितेचा नसून उन्नाव मधील सेवक खेडा गावात रहाणा-या गोल्डी यादव 20 वर्षीय तरुणीची असून जिची 2018 मध्ये गावातीलच एका तरुणाने हत्या केली होती.
Result- Misleading
Our Sources
बोलता हिंदुस्तान- https://boltahindustan.in/bh-english-2/yogi-busy-in-communal-politics-as-girls-getting-murdered/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.