Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
25 डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा 98 वा वाढदिवस देशभरात साजरा करण्यात आला. दरम्यान, सोशल मीडियावर एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो व्हायरल होऊ लागला, ज्यामध्ये एक महिला एका मुलासोबत दिसत आहे. हा अटलबिहारी वाजपेयी यांचा बालपणीचा फोटो असून ती महिला त्यांची आई असल्याचा दावा केला जात आहे. या दाव्यासह हजारो लोकांनी फोटो शेअर केला आहे.
अनेकांनी मराठीत हा दावा व्हाट्सअप वर शेयर करण्यास सुरुवात केली आहे.
व्हायरल फोटोसह करण्यात येत असलेला दावा खोटा आहे. हा फोटो अटलबिहारी वाजपेयींचा नाही. हा फोटो बिहारमधील मुजफ्फरपूर येथील रहिवासी असलेल्या राणू शंकर नावाच्या व्यक्तीच्या बालपणीचा आहे. फोटोत दिसणारी महिला राणूची आई आहे.
वाजपेयींच्या बालपणीचा असे सांगून हा फोटो यापूर्वीही अनेकदा व्हायरल झाला आहे. राणू शंकर यांनी 2018 मध्ये त्यांच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट लिहिली होती की, त्यांचा बालपणीचा फोटो अटल बिहारी वाजपेयींचा म्हणून शेअर केला जात आहे.
त्यावेळी राणूने द लल्लनटॉप आणि आजतकला सांगितले होते की, चित्रात दिसणारी महिला त्याची आई नीलम शंकर आहे. हे चित्र 1977 किंवा 1978 मध्ये मुझफ्फरपूरमध्ये काढण्यात आले होते. मे 2018 मध्ये मदर्स डेच्या दिवशी त्याने हा फोटो शेअर केला होता. पण कोणीतरी खोटा दावा करून व्हायरल केला.
राणू शंकर मुझफ्फरपूरमध्ये गांधी स्वराज आश्रम नावाची संस्था चालवतात. अशाप्रकारे, व्हायरल झालेला फोटो अटलबिहारी वाजपेयी आणि त्यांच्या आईचा नाही, हे आमच्या तपासात सिद्ध झाले आहे. वाजपेयींच्या जयंतीच्या निमित्ताने खोटा दावा करून हा फोटो शेअर केला जात आहे.
तुम्हाला ही वस्तुस्थिती तपासणी आवडली असेल आणि तुम्हाला अशा आणखी तथ्य तपासण्या वाचायच्या असतील तर येथे क्लिक करा.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in