Thursday, May 23, 2024
Thursday, May 23, 2024

HomeCoronavirusरशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टम करुन सत्य समोर आणले?

रशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टम करुन सत्य समोर आणले?

Authors

रशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टेम करुन सत्य बाहेर आणल्याचा दावा करणारा एक मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. रशियाने जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) नियमावलीविरुद्ध जात कोविड-19 मुळे मृत्यू झालेल्या लोकांचे पोस्टमार्टेम केले आणि कोरोना हा व्हायरस नसून बॅक्टेरिया असल्याचे सत्य समोर आहे. असा दावा मेसेजमध्ये करण्यात आला आहे.

काय म्हटले आहे मेसेजमध्ये?

रशिया हा कोविड -19 पेशंटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन (पोस्टमार्टम) करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. सखोल तपासणी नंतर, हे समजले की कोविड -१९ हा विषाणू म्हणून अस्तित्वात नाही तर किरणोत्सर्गी करणास संसर्ग झाल्यामुळे आणि रक्तात गुठळ्या निर्माण झाल्यामुळे मानवी मृत्यूस कारणीभूत ठरणारा एक बॅक्टेरियम आहे.कोविड -१९ हा रोग रक्त गोठण्यासाठी कारणीभूत ठरणारा  एक आजार आहे ज्यामुळे मानवी शरीरामध्ये रक्त गोठण्यास कारणीभूत ठरतो आणि रक्तवाहिन्यांमधे रक्त गोठण्यास कारणीभूत ठरल्या मुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते त्यामुळे मेंदू, हृदय आणि फुफ्फुसांना ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे  ऑक्सिजन अभावी लोक मरतात.श्वसन उर्जेच्या कमतरतेचे कारण शोधण्यासाठी, रशियामधील तज्ञ डॉक्टरांनी ‘डब्ल्यूएचओ’ प्रोटोकॉल पाळला नाही आणि कोविड-19 पेशंटच्या मृतदेहावर शवविच्छेदन केले यात डॉक्टरांनी हात, पाय आणि शरीराचे व इतर भाग उघडल्यानंतर व त्यांचे काळजीपूर्वक परीक्षण केल्यावर त्यांच्या असे लक्षात आले की रक्तवाहिन्या विरघळल्या आहेत आणि रक्तात गुठळ्या भरल्या आहेत, ज्यामुळे रक्तप्रवाहाला अडथळा निर्माण होतो आणि शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह कमी होतो यामुळे रुग्णाचा मृत्यू होतो.या संशोधनाबद्दल जाणून घेतल्यानंतर रशियन आरोग्य मंत्रालयाने त्वरित कोविड -19 साठी केल्या जाणाऱ्या  उपचाराचा  प्रोटोकॉल बदलला आणि आपल्या सकारात्मक रूग्णांना 100 मिलीग्राम अ‍ॅस्पिरिन आणि इम्रोमॅक घेणे सुरू केले याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांचे आरोग्य सुधारू लागले. रशियन आरोग्य मंत्रालयाने एका दिवसात 14,000 हून अधिक रुग्णांना या आजारातून बाहेर काढले आणि त्यांना बरे करुन घरी  पाठवले.वैज्ञानिक शोधाच्या काही काळानंतर, रशियामधील डॉक्टरांनी हा रोग ‘जागतिक युक्ती’ असल्याचे सांगून या रोगाच्या उपचार पद्धतीची माहिती दिली, “हे रक्तवाहिन्या जमावट (रक्त गुठळ्या तयार होणे) आणि योग्य उपचार पध्दतीशिवाय काही नाही.ज्या रुग्णांना कोविड -19 ची लागण झी आहे  यासाठी  त्यांनी पुढील उपचार पद्धतीचे अवलंब करायला  सांगितले जेणे करून तत्काळ बरा होवू शकतोप्रतिजैविक गोळ्या
दाहक विरोधी आणिअँटीकोआगुलंट (अ‍ॅस्पिरिन) इ. घ्यावेThe article and post captions say, “it cannot be assumed that it is a virus, but rather bacteria that cause death and lead to the formation of blood clots in the veins and nerves, from which the patient dies,” adding that “bacteria exposed to 5G rays” are to blame. They allege that “ventilators and intensive care units were never used” in Russia and that this disease can be “cured” by “antibiotic tablets, anti-inflammatory and taking anticoagulants (aspirin)”.यावरून हे सूचित होते की रोगाचा उपचार करणे सहज शक्य आहे.इतर रशियन शास्त्रज्ञांच्या मते, कोवीड-१९ या आजाराच्या उपचारासाठी व्हेंटिलेटर आणि आयसीयू ची कधीच आवश्यक नसते या परिणामाचे प्रोटोकॉल रशियामध्ये यापूर्वीच प्रकाशित केले गेले आहेत.चीनला ही गोष्ट आधीच माहित आहे, परंतु त्याने आपला अहवाल कधीच जाहीर केला नाही.ही माहिती आपल्या कुटुंबासह, शेजार्‍यांना, ओळखीच्या व्यक्ती, मित्र आणि सहका-यांना  सामायिक करा जेणेकरुन त्यांना कोविड -19 या आजाराच्या भीतीपासून मुक्ती मिळू शकेल आणि हे समजेल की हा एक विषाणू नाही तर फक्त एक किटाणू आहे ज्याला केवळ रेडिएशनचा धोका आहे.केवळ अत्यंत कमी प्रतिकारशक्ती असणार्‍या लोकांनीच याची काळजी घ्यावी.  मात्र या किरणोत्सर्गामुळे पेशंटला जळजळ हायपोक्सिया देखील होतो यासाठी पीडितांनी एस्प्रिन -100 मिलीग्राम आणि अप्रोनिक किंवा पॅरासिटामोल 650 मिलीग्राम घ्यावे.  स्रोत: रशियन आरोग्य मंत्रालय, रशिया

आमच्या अनेक वाचकांनी व्हाटसअॅपववर व्हायरल होत असलेल्या या मेसेजची सत्यता पडताळणी विनंती केली. आम्हाला हा मेसेज फेसबुकवर देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले.

संग्रहित

व्हायरल होत असलेला दावा बारकाईने वाचल्यास यातील महत्वाचे काही मुद्दे समोर येतात ते खालील प्रमाणे आहेत.

रशिया हा कोरोनाने मृत पावलेल्या पेशंटच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करणारा जगातील पहिला देश ठरला आहे. येथील तज्ज्ञ डाॅक्टरांनी जागतिक आरोग्य संघटनेचा (WHO)चा प्रोटोकाॅल पाळला नाही आणि या मृतांचे पोस्टमार्टेम केले. कोविड -19 हा व्हायरस नसून तो एक बॅक्टेरिया आहे जो मानवी मृत्यूस कारणीभूत ठरत आहे. हा रोग रक्त गोठवतो मेंदू हृदय आणि फुफ्पुसांना आॅक्सिजन मिळत नाही त्यामुळे लोकांचा मृत्यू होता. रशियाने रूग्णांना 100 मिलीग्राम अ‍ॅस्पिरिन आणि इम्रोमॅक घेणे सुरू केले याचा परिणाम म्हणून रुग्ण बरे होऊ लागले आणि त्यांचे आरोग्य सुधारू लागले.रशियामधील डॉक्टरांनी हा रोग ‘जागतिक षढयंत्र’ असल्याचे म्हटले हे असा दावा ही यात करण्यात आला आहे.

Fact Check/Verification

व्हायरल दाव्याची पडताळणी करत असताना आपण एकेक मुद्

रशिया हा कोविड-19 ने मृत पावलेल्यांच्या मृतदेहाचे पोस्टमार्टेम करणारा जगातील पहिला देश आहे असता दावा पोस्टमध्ये करण्यात आला आहे ,मात्र हा दावा खरा नाही या आधीही जर्मनी, अमेरिका, इटली आणि इंग्लंड या देशांनी कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टेम केलेले आहे.

रशियाने जागितक आरोग्य संघटनेचा (WHO)चा प्रोटोकॉल मोडून कोरोना मृताचे पोस्पटमार्रंटेम केल्याचे पोस्टमध्ये म्हटले हे. मात्र WHOने पोस्टमोर्टेमवर बंदी असल्याचे नियम लावलेच नाहीत. उलट सुरक्षितपणे शवविच्छेदन कसे करावे याच्याविषयी मार्गदर्शन केले आहे.

रशियाने कोविड-19 च्या मृत रुग्णांचा डेड बाॅडीजवर संशोधन केले हा व्हायरस नसून मानवी मृत्यूस कारणीभूत असणारा एक बॅक्टेरियम बॅक्टेरियम आहे असे आढळले असा दावा मेसेजमधये करण्यात आला आहे. आम्ही रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाईटला भेट दिली असता तेथे कोविड-19 चा उल्लेख SARS-CoV-2 virus असा केला असल्याचे आढळून आले.

कोविड-19 च्या रूग्णांना 100 मिलीग्रॅम अ‍ॅस्पिरिन आणि इम्रोमॅक सारखे अॅंटिबायोटिक्स दिल्यानेच म्हणून त्यांच्यात सुधारणा झाली असे म्हटले आहे पण हा दावा ही तितकासा खरा नाही, कारण हाॅस्पिटमध्ये भरती झाल्यानंतर इतर बॅक्टेरीयांचा शरीरावर हल्ला होऊ नये म्हणून अँटीबायोटीक दिल्या जातात. त्यांचा कोरोना विषाणूवर थेट फरक पडत नाही, जागतिक आरोग्य संघटनेने याबाबत माहिती दिली आहे.

रशियामधील डॉक्टरांनी हा कोविड-19 हा रोग ‘जागतिक षढयंत्र’ असल्याचे म्हटले हे असा दावा ही यात करण्यात आला आहे व या माहितीचा स्त्रोत रशियाचे आरोग्य मंत्रालय असल्याचे म्हटले आहे, पण मंत्रालयाच्या वेबसाईटवर असा कोणताही उल्लेख आढळून आलेला नाही.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, रशियातील डाॅक्टरांनी कोविड-19 च्या पेशंटचे पोस्टमार्टेम करुन तो व्हायरस नसून बैक्टिरियम आहे सिद्ध केलेले नाही. सोशल मीडियात चुकीचा दावा व्हायरल झाला आहे.

Read More : रतन टाटांनी देशाला कोरोनामुक्त करण्यासाठी सगळी संपत्ती दान करण्यास तयार असल्याचे म्हटलेले नाही

Result: False

Claim Review: रशियाने कोविड-19 च्या मृतांचे पोस्टमार्टम करुन सत्य समोर आणले.
Claimed By: Viral Post
Fact Check: False

Our Sources

रशिया आरोग्य मंत्रालय- https://covid19.rosminzdrav.ru/

जागतिक आरोग्य संघटना –https://www.who.int/publications/i/item/infection-prevention-and-control-for-the-safe-management-of-a-dead-body-in-the-context-of-covid-19-interim-guidance


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular