Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckScience and Technologyइस्रोने रेडिओ गार्डन खरंच विकसित केलंय? भ्रामक दावा व्हायरल

इस्रोने रेडिओ गार्डन खरंच विकसित केलंय? भ्रामक दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, इस्रोने रेडिओ गार्डन विकसित केलं आहे.

अप्रतिम…आमचा इस्रो खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा…..मग तुम्हाला हिरवे ठिपके दिसतील…ते जगभरातील FM रेडिओ स्टेशन आहेत…

जेव्हा तुम्ही कोणत्याही हिरव्यावर क्लिक कराल. dot तुम्ही संबंधित भागातील एफएम रेडिओ ऐकू शकता आणि आनंद घेऊ शकता..

आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशा प्रकारे ऐकण्यासाठी कोणत्याही इअरफोनची गरज नाही….

फक्त अप्रतिम… अभिमान आहे आमच्या ISRO चा

http://radio.garden/live

फेसबुकवर हा मेसेज शेअर केला जात आहे. 

फोटो साभार : Facebook/Santosh Jadhal
फोटो साभार : Facebook/Amol Arangale Maratha

ट्विटरवर देखील हा मेसेज शेअर केला जात आहे. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

न्यूजचेकरला (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर एका युजरने हा दावा तथ्य पडताळणीसाठी पाठवला आहे.

व्हाट्स अॅप नंबरवर पाठवलेला दावा

Fact Check / Verification

इस्रोने रेडिओ गार्डनची निर्मिती केलीये, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही रेडिओ गार्डनचे संकेतस्थळ तपासले. नेदरलँडस् इन्स्टिट्यूट फॉर साउंड अॅन्ड व्हिजनद्वारे ट्रान्सनॅशनल रेडिओ एन्काउंटर्स या संशोधन प्रकल्पाच्या संदर्भात २०१६ मध्ये रेडिओ गार्डनची सुरवात झाली. Studio Puckey & Moniker यांनी ते तयार केले, त्याचे डिझाईन करून त्याला विकसित केले. यात कुठेही आम्हांला इस्रोचा उल्लेख केलेला आढळला नाही. 

फोटो साभार : Radio Garden

रेडिओ गार्डन नेमके काय आहे?

द गार्डीयनच्या लेखानुसार, रेडिओ गार्डन हे फ्री अॅप आहे. हे हजारो रेडिओ स्टेशनचे २४ तास थेट प्रक्षेपण करते. कोरोनाच्या काळात याच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली आहे. या अॅपचे संस्थापक Jonathan Puckey म्हणाले की, गेल्या ३० दिवसांत आमचे १५ दशलक्ष वापरकर्ते झाले. म्हणजेच जवळपास एका महिन्यात ७५० टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

फोटो साभार : The Guardian

त्यानंतर आम्हांला द न्यू इंडियन एक्सप्रेसची बातमी मिळाली. “इस्रोचा आपल्याला अभिमान वाटतो.. पण असे नाही !” या शिर्षकाची ८ मे २०१७ ची बातमी मिळाली. त्यात लिहिलंय की, इस्रोवर भारतीयांना अभिमान वाटावा, असे भरपूर काही असले तरी दुर्दैवाने रेडिओ गार्डन हे त्यापैकी एक नाही. 

फोटो साभार : The New Indian Express

या व्यतिरिक्त आम्हांला पीआयबीचे १० एप्रिल २०२१ रोजीचे एक ट्विट मिळाले. त्या ट्विटमध्ये देखील लिहिलंय की, हा दावा फेक आहे. इस्रोने असे कोणतेही रेडिओ पोर्टल विकसित केले नाही. 

 या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता.

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, इस्रोने रेडिओ गार्डन विकसित केलेले नाही. सोशल मीडियावर केला जाणारा हा दावा फेक आहे.

Result : False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular