सोशल मीडियात व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यान कोकणातील समुद्र किना-यावर उसळलेल्या लाटांचा असल्याचा दावा केला जात आहे. दोन दिवसांपूर्वी अरबी समुद्रात निर्माण झालेल्या ताउक्ते चक्रीवादळाचा फटका महाराष्ट्र आणि गुजरातच्या किनारपट्टीला बसला तसेच मुंबईसह राज्यात ब-याच ठिकाणी पाउस देखील पडला. याच दरम्यान हा उसळेल्या लाटांचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ कोकणातील देवगडमधील कुणकेश्वर येथील समुद्र किना-यावरील असल्याचा दावा केला जात आहे.

हा व्हिडिओ टिव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने देखील कोकणात मुसळधार पावसाच्या इशाराच्या बातमीत देखील दाखवला आहे. ताऊक्ते वादळादरम्यान सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आल्याचे म्हटले आहे तसेच लांटाच्या रौद्ररुपाचा हा व्हिडिओ देखील बातमीत दाखवण्यात आला आहे.

Fact Check/Verification
व्हायरल व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यानचा कोकणातील कुणकेश्वर येथील आहे का याची सत्यता पडतळण्याचा आम्ही प्रयत्न केला. आम्ही काही किवर्डसच्या साहाय्याने शोध घेण्यास सुरुवात केली असता आम्हाला पत्रकार शैलजा जोगळ यांच्या ट्विटर हॅंडलवर वादळादरम्यानची कोकण किनारपट्टीवर उसळेलेल्या लाटांची व्हिडिओ क्लिप आढळून आली. मात्र यात क्लिपमध्ये आणि व्हायरल क्लिपमध्ये साम्य आढळून आले नाही.
कुणकेश्वरचा समुद्र किनारा कसा आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला kokansearch या वेबसाईटवर येथील बीचचा फोटो आढळून आला.

हा मात्र तो व्हायरल फोटोतीलल समुद्र किना-याएवढा डेव्हलप नसेलला व पूर्णपणे वेगळा असलेला हा समुद्र किनारा असल्याचे स्पष्ट झाले. मग आम्ही व्हायरल व्हिडिओ नेमका कुठला आहे याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी आम्ही रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने तसेच काही किवर्डसचा आधार घेतला असता हा व्हिडिओ ताऊक्ते वादळा दरम्यानचा नसून जानेवारी महिन्यात उत्तर स्पेनमधील सॅन सॅबॅस्टिअन शहरातील समुद्र किना-यावर उसळेलेल्या लाटांचा असल्याचे एका युट्यूब चॅनलेवर अपलोड केलेल्या व्हिडिओतील दृश्यावरुन आढळून आले.
या व्हिडिओतील 1.17 मिनिटांपासून पुढील दृश्य आणि व्हायरल व्हिडिओतील 30 सेंकमधील सुरुवातीची काही सेंकदाची दृश्ये एकच असल्याचे स्पष्ट झाले. आपण दोन्ही दृश्यांची तुलना खाली पाहू शकता.

Conclusion
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यान कोकणातील कुणकेश्वर येथील समुद्र किना-यावर उसळलेल्या रौद्र लाटांचा नसून स्पेनमधील स्पेनमधील सॅन सॅबॅस्टिअन शहरातील समुद्र किना-यावर उसळेलेल्या लाटांचा आहे.
Read More : देशी दारुच्या काढ्याने कोरोना रुग्ण बरे होत असल्याचा डाॅक्टरचा दावा, जाणून घ्या सत्य
Result: Misleading
Claim Review: व्हायरल व्हिडिओ ताऊक्ते वादळादरम्यान कोकणातील समुद्र किना-यावर उसळलेल्या लाटांचा Claimed By: Social Media post Fact Check: Misleading |
Our Sources
kokansearch- http://www.kokansearch.com/beaches/marathi/beaches_in_sindhudurg/kunkeshwar_beach/
YouTube -https://www.youtube.com/watch?v=Ar-npqN3N-g
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.