गुजरातमधील सोमनाथ मंदिरात दलितांना प्रवेशबंदी करण्यात आल्याच्या पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होत आहेत. या पोस्टमध्ये एका हिंदी वर्तमानपत्राच्या बातमीचे कात्रण शेअर करण्यात आले आहेत. बातमीत म्हटले आहे की, सोमनाथ महादेव मंदिराच्या बाहेर काही लोकांनी न हरिजनांना मंदिरात प्रवेशबंदीचे बोर्ड लावले आहेत. या प्रकरणावर वादंग निर्माण होताच पोलिसांना पाचारण करण्यात आले. बोर्ड लावणा-यांचे म्हणणे आहे की, यात काहीच चुकीचे नाही.
Fact Check / Verification
सोमनाथ मंदिरात खरंच दलितांना प्रवेश नाकारण्यात आला आहे का याबाबत आम्ही पडताळणी सुरु केली. गूगलमध्ये काही किवर्डसच्या आधारे शोध सुरु केला. आणखी एक फेसबुक पोस्ट आढळून आली ज्यात दलिताना सोमनाथ मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आल्याचा माहिती देण्यात आली आहे. याही पोस्टमध्ये बातमीचे कात्रण शेअर करण्यात आले आहे.

या दरम्यान आम्हाला जनसत्ता या हिंदी दैनिकाच्या वेबसाईटवर बातमी आढळून आली. या बातमीत म्हटले आहे की, कुणीतरी मंदिराबाहेर दलितांना प्रवेशबंदीचा बोर्ड लावल्याने गावात तणाव निर्माण झाला होता पण पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि बोर्ड देखील हटविण्यात आला.

याशिवाय Indian Express च्या वेबसाईटवर देखील याबाबतची बातमी आढळून आली. यात देखील दलितविरोधी बोर्ड लावल्याने तणाव निर्माण झाल्याचे व काही युवकांनी या प्रकरणी माफी मागितल्याचे म्हटले आहे.

Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोमनाथ मंदिरात दलिताना प्रवेश बंदीचा बोर्ड काही लोकांनी खोडसाळपणे लावला होता. नंतर तो हटविण्यात आला मात्र सोशल मीडियात चुकीची दावा व्हायरल झाला.
Result- Misleading
Sources
Indian Express- https://indianexpress.com/article/cities/ahmedabad/ahmedabad-tension-in-anand-village-after-harijans-banned-from-temple-5921935/
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.