सोशल मीडियावर एक मेसेज शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केला जातोय की, युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केले आहे. तो मेसेज खाली जोडत आहे.

फेसबुकवर देखील हा मेसेज शेअर केला जात आहे.

न्यूजचेकरला (+९१-९९९९४९९०४४) या व्हाट्स अॅप नंबरवर दोन युजरने हा दावा तथ्य पडताळणीसाठी पाठवला आहे.

Fact Check / Verification
युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केले आहे, याची पडताळणी करण्यासाठी आम्ही गुगलवर या संदर्भात शोधले. पण आम्हांला याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही. आम्ही युनेस्कोचे अधिकृत संकेतस्थळ आणि त्यांच्या ट्विटर खात्यावर देखील या संदर्भात माहिती शोधली, पण आम्हाला या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. त्यानंतर आम्हांला २७ डिसेंबर २०१६ मधील इंडियन एक्सप्रेसची बातमी मिळाली. “२०१६: आपण (जवळपास) विश्वास ठेवलेल्या टॉप १० फेक बातम्या फॉरवर्ड” असं त्या बातमीचे शीर्षक आहे.

या बातमीत दुसऱ्या क्रमांकावर युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केले, हा देखील मेसेज आहे. त्यानुसार, हा चुकीचा मेसेज २००८ पासून सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.

त्यानंतर आम्हांला ३० सप्टेंबर २००८ मधील इंडिया टुडेची बातमी मिळाली. ‘भारतीय राष्ट्रगीत’ ई-मेल खोटा: युनेस्को असे त्याचे शीर्षक होते. त्या बातमीनुसार, इंडिया टुडेने युनेस्कोला याविषयी तपशील आणि स्पष्टीकरण मागितले.

तेव्हा स्यू विलियम्स (मुख्य संपादकीय, प्रेस रिलेशन आणि युनेस्को कुरिअर, सार्वजनिक माहिती ब्युरो, युनेस्को) यांनी उत्तर दिले की, असा कोणताही पुरस्कार जाहीर झालेला नाही. आम्हांला माहित आहे की, भारतातील अनेक ब्लॉग याची माहिती देत आहे. पण तुम्हांला खात्री देतो की, युनेस्कोने भारताच्या किंवा कोणत्याही देशाच्या राष्ट्रगीताबाबत अशी कोणतीही घोषणा केलेली नाही.

Conclusion
अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, युनेस्कोने भारतीय राष्ट्रगीताला ‘जगातील सर्वोत्कृष्ट २०२२’ म्हणून घोषित केल्याचा हा दावा चुकीचा आहे. सोशल मीडियावर २००८ पासून हा खोटा मेसेज शेअर केला जात आहे. तेव्हा न्यूजचेकर हिंदीने २०१८ मध्ये याचे फॅक्ट चेक केले होते, ते तुम्ही इथे वाचू शकता.
Result : False
Our Sources
२७ डिसेंबर २०१६ मध्ये इंडियन एक्सप्रेसमध्ये प्रकाशित झालेली बातमी
३० सप्टेंबर २००८ मध्ये प्रकाशित झालेली इंडिया टुडेची बातमी
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.