तुर्कीमधील इजमिर शहरात शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. या भूकंपात आतापर्यंत 65 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 800जण जखमी झाले आहेत. शेकडो इमारतींना हादरे बसून मोठे नुकसान झाले आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच सोशल मीडियावर या भूकंपाची दृश्ये म्हणून काही फोटो शेअर होत आहेत. यात एक फोटो ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीचा कुत्रा शोध घेतानाचा आहे. पोस्टमध्ये ढीगाऱ्याखाली अडकलेल्या एका व्यक्तीजवळ बसलेल्या कुत्र्याचा फोटो शेयर करून म्हटले की, तुर्कस्थानमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपानंतर प्राण्यांचा माणसाप्रती असलेला जिव्हाळा दर्शविणारा फोटो”

ट्विटरवर देखील हे फोटो तुर्कीमधील भुंकपाचे असल्याचा दावा केला जात आहे.
Fact Check/Verification
व्हायरल फोटो तुर्कीमधील भुंकपाचे आहेत काय याची पडताळणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला, गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता या फोटोंचे अनेक परिणाम दिसून आले.

शोधा दरम्यान आढळून आले की, व्हायरल फोटो हे 2018 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहेत. जारोस्लाव नोस्का नावाच्या फोटोग्राफर हे फोटो काढले आहेत. अॅलेमी या स्टॉक फोटो वेबसाईटवर उपलब्ध आहेत.


Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, तुर्कीतील भुकंपाच्या नावाने जुनेच फोटो व्हायरल झाले आहेत. दोन वर्षापूर्वी जारोस्लाव नोस्का नावाच्या फोटोग्राफर हे फोटो काढले आहेत त्याचा तुर्की भुंकपाशी संबंध नाही.
Result: Misleading
Our Source
alamy.com- https://www.alamy.com/dog-looking-for-injured-people-in-ruins-after-earthquake-image230074182.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला [email protected] वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.