Wednesday, July 17, 2024
Wednesday, July 17, 2024

HomeFact Checkपोलिसांनी अर्णव गोस्वामीला मारहाण केल्याचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

पोलिसांनी अर्णव गोस्वामीला मारहाण केल्याचा नाही व्हायरल फोटो, हे आहे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

पोलिसांनी अर्णब गोस्वामीला मारहाण केल्याच्या दाव्याने एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोत पोलिस एका व्यक्तीला जमिनीवर आडवा करुन त्याचे पाय ओढत त्याला मारहाण करत असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की पोलिसांनी रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी सोबत अशी अमानवीय वर्तवणूक केली. पोलिसांनी अर्णब गोस्वामीला 2018 मधील एका आत्महत्या प्रकरणात अटक केली आहे. यानंतर अर्णब ने त्याला पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे.

ट्वविटर/ संग्रहित

Fact Check/Verification

व्हायरल फोटो अर्णव गोस्वामीला पोलिसांकडून झालेल्या मारहाणीचा आहे का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता न्यूज 18 ची 10 जानेवारी 2020 रोजी प्रसिद्ध झालेली बातमी आढळून आली. या बातमीत व्हायरल फोटो शेअर करण्यात आला आहे. बातमीनुसार, उत्तर प्रदेशमधील देवरिया जिल्ह्यात पोलिस ठाण्यात एका व्यक्तीला तीन पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचे म्हटले आहे. जानेवारी 2020 मधील घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणी त्यांच्याविरोधात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. या वृत्तानुसार, मदनपूर पोलिस ठाण्यांतर्गत माहेन गावात राहणारे विश्वेश्वर तिवारी यांनी 8 जानेवारी रोजी फोन चोरीची तक्रार दाखल केली होती. विश्वेश्वर यांनी ही तक्रार सुमित गोस्वामी याच्याविरूद्ध दाखल केली होती. यानंतर आरोपीला पोलिस ठाण्यात आणले आणि नंतर पोलिसांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणात योग्यप्रकारे चौकशी न केल्याचा पोलिसांवरही आरोप होता.

पोलिस स्टेशनमध्ये सुमित गोस्वामीला झालेल्या बेदम मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ देखील आपण खाली पाहू शकता.

अर्णव गोस्वामीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा व्हिडिओ देखील आम्हाला आढळून आला. मात्र त्या व्हिडिओत आणि व्हायरल फोटोत कुठलेही साम्य आढळून आले नाही.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, उत्तरप्रदेश पोलिसांनी काही महिन्यांपूर्वी फोन चोरीच्या आरोपाखाली इसमाला मारहाण केल्याचा फोटो अर्णब गोस्वामीला पोलिसांनी केलेल्या मारहाणीचा म्हणून चुकीच्या दाव्याने शेअर करण्यात येत आहे.

Result: Misleading

Our Source

news18.com- https://www.news18.com/news/india/shoe-on-face-legs-in-the-air-belt-buckle-beating-on-cam-up-polices-punishment-for-phone-thief-2453419.html

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular