Wednesday, December 25, 2024
Wednesday, December 25, 2024

HomeFact CheckReligionजातीयवादाच्या नावाखाली शेअर केला जाणारा मारहाणीचा व्हिडिओ खरंच राजस्थानातील आहे ? 

जातीयवादाच्या नावाखाली शेअर केला जाणारा मारहाणीचा व्हिडिओ खरंच राजस्थानातील आहे ? 

नुकतेच राजस्थानच्या जोधपूरमध्ये जातीयवादाची हिंसा घडली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे. व्हिडिओत काही लोकं तरुणाला बेदम लोखंडी सळईने मारतांना दिसत आहे. त्यात त्या तरुणाच्या तोंडातून रक्त बाहेर पडतांना दिसत आहे. 

या व्हिडिओच्या माध्यमातून असा दावा केला जातोय की, जोधपूरमध्ये मुस्लिमांनी भर रस्त्यात एका तरुणाची हत्या केली. त्याचबरोबर पोस्टमध्ये लिहिलंय की, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जोधपूरमधील इंटरनेट यासाठी बंद केलंय की, मुस्लिम हिंदूंना मारू शकतील. 

या दाव्याचा व्हिडिओ फेसबुक आणि ट्विटरवर खूपच व्हायरल झाला आहे.

फोटो साभार : Twitter@KilakSukhram

या ट्विटची संग्रहित केलेली लिंक तुम्ही इथे पाहू शकता.

फोटो साभार : Facebook/Balwant Singh Rajpurohit Langera

आता ३ मे रोजी ईदच्या दिवशी धार्मिक हिंसेची घटना घडली. या हिंसेची सुरवात झेंडा लावण्यापासून झाली. यामुळे राजस्थानच्या जोधपूर प्रशासनाने शहरात कर्फ्यु लावले आणि इंटरनेट सेवा बंद केल्या.

त्यातच आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यात असा दावा केलाय की, राजस्थानच्या जोधपूरमध्ये मुस्लिमांनी एका हिंदूची भर रस्त्यात हत्या केली. याची तथ्य पडताळणी आधी हिंदीमध्ये केली आहे. तुम्ही ते इथे वाचू शकता.

Fact Check / Verification

राजस्थानमधील जोधपूरच्या नावाने व्हायरल झालेल्या व्हिडिओची पडताळणी करत असतांना आम्हाला १ मे २०२२ ची अमर उजालाची एक बातमी सापडली. त्या बातमीत व्हिडिओच्या काही फ्रेमचा वापर केला आहे. 

बातमीनुसार, ही घटना हरियाणातील यमुनानगरमधील आहे. जेथे एका दारूच्या ठेकेदाराची भर रस्त्यात मारहाण करण्यात आली. त्या बातमीत सांगितलंय की, यमुनानगरच्या साधौरा भागांतील २५ वर्षीय कमलजीत याची काही डझनभर लोकांनी लोखंडी सळई आणि अन्य हत्यारांनी त्याची मारहाण केली.

त्याला एवढ्या निर्दयीपणे मारण्यात आले की, कमलजीतचे दात, हात आणि पायांची हाडे मोडली. हे प्रकरण एका जुन्या घटनेतून घडल्याचे बातमीत सांगितले जात आहे. या घटनेविषयी अनेकांनी बातम्या प्रकाशित केल्या आहे.

या घटनेविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आम्ही साढौरा पोलीस स्थानकाशी संपर्क साधला. पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेला कुठलीही धार्मिक बाजू नाही. आतापर्यंतच्या तपासात हे समोर आलंय की, एक आरोपी मुस्लिम आहे आणि बाकी हिंदू आहे. या घटनेसंबंधित आतापर्यंत चार जणांना अटक केली आहे. अजून काही अन्य आरोपींना पकडायचे बाकी आहे.

यमुनानगरचे पोलीस अधीक्षक सुरेंद्र पाल यांनी न्यूजचेकरला देखील हेच सांगितले की, या घटनेत हिंदू-मुस्लिम असा कोणताही प्रकार नाहीये.

या घटनेसंबंधित आम्ही पीडित कमलजीतचे वडील राजेंद्र सिंह यांच्याशी बोललो. राजेंद्र यांनी सांगितले,”माझ्या मुलाची पैशांच्या व्यवहारातून एका व्यक्तीशी भांडण झाले. याचा बदला घेण्यासाठी त्या व्यक्तीने त्याच्या सहकाऱ्यांसोबत माझ्या मुलाला मारहाण केली. पण यात कुठलीही धार्मिक बाजू नाही.”

राजेंद्र यांनी या घटनेसंबंधित वृत्तपत्रात छापून आलेली एक बातमी पाठवली. या बातमीत अटक झालेल्या चार आरोपींचे आणि अन्य काहींची नावे लिहिलेली दिसत आहे. 

राजेंद्र सिंह यांनी पाठवलेली बातमी

हे देखील वाचू शकता : व्हायरल होणारा संदेश खरंच महाराष्ट्र पोलीस यांनी लिहिलाय ? जाणून घ्या सत्य काय आहे

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हरियाणातील मारहाणीचा व्हिडिओ राजस्थानच्या जोधपूरचा सांगत त्यात खोट्या जातीयवादाचा दावा केला जात आहे. 

Result : False Context/False

Our Sources

१ मे २०२२ रोजी छापून आलेली अमर उजालाची बातमी

१ मे २०२२ रोजी छापून आलेली दैनिक त्रिबुनची बातमी

फोनवरून हरियाणा पोलीस आणि पीडित मुलाच्या वडिलांशी झालेला संवाद

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular