Sunday, June 16, 2024
Sunday, June 16, 2024

HomeFact CheckWeekly Wrap: सप्ताहभरात सोशल मीडिया पर व्हायरल झालेल्या टॉप 5 फेक दाव्यांचे...

Weekly Wrap: सप्ताहभरात सोशल मीडिया पर व्हायरल झालेल्या टॉप 5 फेक दाव्यांचे Fact Check

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

महाराष्ट्रासह देशभरातील वेगवेगळा भागात मान्सूनच्या पावसाने प्रचंड नुकसान केले आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडिओज देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. पण अशातच जुने फोटो आणि व्हिडिओ देखील चुकीच्या दाव्याने शेअर होत आहेत. याशिवाय घरगुती वापराच्या एलपीजी गॅस सिलिंडरवर राज्य सरकार 55 टक्के कर आकारत असल्याचा दावा तसेच संघ स्वंयसेवकांनी महाडच्या पुरग्रस्तांसाठी स्वयंपाक तयार केल्याचा फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाला. याशिवाय इतरही दावे सोशल मीडियात व्हायरल झाले.

राज्य सरकार एलपीजी सिलिंडरवर 55% कर आकारत आहे का?

एलपीजी सिलिंडर्सवर केंद्र सरकार 5 % कर आकारते तर राज्य सरकार 55% कर वसूल करते असा मेसेज सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. राज्य सरकारने जास्त कर लावल्यानेच गॅसच्या किमतीत आपोआप वाढ होत असल्याचे यातून सूचित करण्यात आले आहे. पण हे खरे नाही राज्य

याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

व्हायरल व्हिडिओ लोणावळा-खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा आहे का?

सोशल मीडियात ट्रेनमधून धधबब्याचे विहंगम दृश्य दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ पुणे-मुंबई रेल्वेमार्गावरील लोणावळा- खंडाळा घाटातील विहंगम दृश्याचा आहे. पण हा दावा चुकीचा आहे.

याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

केंद्र सरकारकडून राज्यातील पूरग्रस्त शेतक-यांना 701 कोटींची मदत, हे आहे सत्य

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यानी पूरग्रस्त भागाची पाहणी करुन मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. यानंतर केंद्र सरकारने देखील 700 कोटींची मदत नुकसानग्रस्त शेतक-यांना देण्याचे जाहीर केल्याच्या बातम्या माध्यमांत प्रसिद्ध झाल्या. पण ही मदत मागील वर्षीच्या नुकसानग्रस्त शेतकर-यांसाठी आहे.

याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

संघ स्वयंसेवकांच्या मदतकार्याचा जुना फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल, जाणून घ्या सत्य

पश्चिम महाराष्ट्रात आणि कोकणातील काही जिल्ह्यांत अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे अतोनात नुकसान झाले.अशातच सर्वाधिक फटका बसलेल्या महाडमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक पूरग्रस्तांसाठी स्वयंपाक तयार करत असल्याचा फोटो देखील सोशल मीडियात व्हायरल झाला. पण हा दावा चुकीचा आहे.

याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा

माळशेज घाटातील नाही दरडीचा व्हिडिओ, चुकीचा दावा व्हायरल

घाटात एक दरडीमुळे वाहतुक विस्कळीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. दावा करण्यात येत आहे की हा व्हिडिओ माळशेज घाटातील दरडीचा आहे. त्यामुळे कल्याण- अहमदनगर महामार्गावरुन प्रवास टाळावा. आमच्या पडताळणीत हा दावा चुकीचा असल्याचे आढळून आले.

याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular