Monday, December 23, 2024
Monday, December 23, 2024

HomeFact CheckReligionज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्यासंबंधितचे भ्रामक फोटो व्हायरल

ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्यासंबंधितचे भ्रामक फोटो व्हायरल

(याची मूळ तथ्य पडताळणी न्यूजचेकर हिंदीने केली आहे आणि हा लेख Arjun Deodia यांनी लिहिला आहे)

वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात सोमवारी हिंदू पक्षाने दावा केला की, त्यांना मशिदीत शिवलिंग मिळाले आहे. याच दरम्यान सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले. त्यात असा दावा केलाय की, हे फोटो ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणात मिळालेल्या शिवलिंगाचे आहे.

फेसबुक आणि ट्विटरवर हे फोटो व्हायरल झाले आहे. एका फोटोत खोदलेल्या जमिनीच्या आत शिवलिंगाच्या आकारासारखा एक दगड दिसत आहे. दुसऱ्या फोटोत पाण्याचे कारंजे दिसत आहे. दोन्ही फोटो ज्ञानवापी मशिदीचे असल्याचे सांगितले जात आहे.

फोटो साभार : Twitter@GutteNeeta
फोटो साभार : Facebook/afzalkhanafridi

बीबीसीच्या एका बातमीनुसार, ज्ञानवापी मशिदीचा वादविवाद १९९१ पासून सुरू झाला. तेव्हा वाराणसी न्यायालयात काही स्थानिक पुजाऱ्यांनी याचिका दाखल केली. याचिकेत म्हटले होते की, मुघल शासक औरंगजेबने ज्ञानवापी मशिदीला काशी विश्वनाथ मंदिराचा एक हिस्सा तोडून बनवले होते. यावर पुजारी न्यायालयात म्हटले की, त्यांना मशिदीत पूजा करण्याची परवानगी मिळाली. 

त्यानंतर ही घटना वेगवेगळ्या न्यायालयात फिरत आहे. नुकतेच वाराणसी न्यायालयाने मशिदीत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. १६ मेला सर्वेक्षण करत असतांना हिंदू पक्षांनी दावा केला की, मशिदीत एक शिवलिंग मिळाले आहे. त्यातच आता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Fact Check/Verification

पहिला फोटो

हा फोटो गुगलवर रिव्हर्स करून शोधल्यावर आम्हांला २०२० मधील काही बातम्या मिळाल्या. त्यात हा फोटो व्हिएतनामचा असल्याचे सांगितले आहे. जिथे खोदकाम करत असतांना ११०० वर्ष जुने एक शिवलिंग सापडले. त्यानंतर काही कीवर्ड टाकल्यावर आम्हांला या घटनेसंबंधित अनेक बातम्या मिळाल्या. ज्यात व्हायरल झालेल्या फोटोशी मिळते-जुळते फोटो आम्हाला दिसले.

एबीपी माझ्याच्या एका बातमीनुसार, २०२० मध्ये व्हिएतनाममध्ये भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण (एएसआय) खोदकाम करत असतांना त्यांना बलुआ दगडाच्या आकाराचे एक मोठे शिवलिंग मिळाले. याची माहिती स्वतः परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर यांनी ट्विटरवरून दिली होती.

भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाला हे शिवलिंग व्हिएतनामच्या माई सोन मंदिराच्या परिसरात मिळाले होते. त्यावेळी हिंदुस्थान टाइम्ससह अन्य वृत्त समूहांनी देखील याची बातमी प्रकाशित केली होती.

दुसरा फोटो

सोशल मीडियावरील युजर कारंजाचा फोटो शेअर करत सांगत आहे की, हा फोटो त्याच शिवलिंगाचा आहे. जो ज्ञानवापी मशिदीत मिळण्याचा दावा हिंदू पक्ष करत होते. पण तो फोटो पाहिल्यावर समजते की, त्याचा आकार शिवलिंगासारखा नाही. यावर काही व्यक्ती म्हणत आहे की, हिंदू पक्ष इतके अंधभक्त झालेत की त्यांना ज्ञानवापी मशिदीमधील कारंजेदेखील आता शिवलिंग दिसत आहे.

पण असं म्हणणाऱ्या लोकांचा दावा चुकीचा आहे. ज्ञानवापीच्या वादविवादात हिंदू पक्षाने या कारंजाचा फोटोबाबत कोणताही दावा केलेला नाही. मुळात हा फोटो २०१६ चा असून तो राजस्थानातील अजमेर शरीफ दर्ग्यातील आहे. याचा ज्ञानवापीशी काहीही संबंध नाही.

१६ मेला सर्वेक्षणाच्या दरम्यान जेव्हा हिंदू पक्षाने दावा केला की, ज्ञानवापी मशिदीत एक शिवलिंग मिळाले आहे. तेव्हा मुस्लिम पक्ष म्हणाले की, हे कुठलेही शिवलिंग नसून एक कारंजे आहे. ज्ञानवापी मशिदीतील रचना शिवलिंग किंवा कारंजेसारखी सांगितली जात आहे, अशी बातमी लोकमतने दिली आहे. पण ही रचना व्हायरल फोटोपेक्षा खूपच वेगळी आहे.

हे देखील वाचू शकता : शरद पवार यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचे नेमके सत्य काय आहे?

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, हे दोन्ही फोटो ज्ञानवापी वादविवादाच्या संबंधितचे नाही. पहिला फोटो व्हिएतनामचा आहे तर दुसरा फोटो अजमेरच्या शरीफ दर्ग्याची आहे. हे फोटो ज्ञानवापी वादविवादात चुकीच्या दाव्यासोबत शेअर केले जात आहे.

Result : False Context/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular