Authors
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन झाले आणि त्यांच्या नावे भलत्याच महिलांचा फोटो घालून व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. आईच्या निधनांनंतर हिंदू रीती रिवाज पळत नरेंद्र मोदींनी मुंडन करून घेतल्याचा दावा करण्यात आला होता. वीज कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निमित्ताने महाराष्ट्रात ७२ तास वीज नसेल असा एक दावा करण्यात आला. थंडीच्या लाटेचा धोका असून अनेक गंभीर आजार होऊ शकतात हा दावा करण्यात आला. कांद्याची चटणी खाल्ल्याने जुनाट खोकला बारा होऊ शकतो. असा दावा करण्यात आला होता. या आणि इतर दाव्याचे सत्य आमच्या या रिपोर्टमध्ये वाचता येईल.
मोदींनी केले मुंडन?
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईचे निधन झाल्यावर मुंडन केले असा दावा करणारा एक फोटो व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा बनावट असल्याचे दिसून आले.
हे फोटो मोदींच्या आईचे नाहीत
हिराबेन मोदी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिवंगत आईचे फोटो असल्याचे सांगून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. आमच्या तपासात भलतेच फोटो वापरले असल्याचे निदर्शनास आले.
महाराष्ट्र अंधारात गेला नाही
महावितरण कर्मचाऱ्यांनी ७२ तास संप करण्याचे जाहीर करताच महाराष्ट्र अंधारात जाणार असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
कांद्याच्या छाटणीने जुनाट खोकला बरा होतो?
कांद्याची चटणी करून ती मधातून घेतल्यास जुनाट खोकला बारा होतो असा दावा करण्यात आला होता. आम्ही केलेल्या तपासात या दाव्याला कोणताही वैज्ञानिक आधार नसल्याचे स्पष्ट झाले.
तापमान कमी होऊन होणार गंभीर आजार?
उत्तर भारतातून येणाऱ्या शीत लहरींमुळे महाराष्ट्रात थंडी वाढून त्यामुळे गंभीर आजार होऊ शकतात असा दावा करण्यात आला होता. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in