Tuesday, June 25, 2024
Tuesday, June 25, 2024

HomeFact CheckViralबहरीनचा राजा रोबोट बाॅडीगार्डसह दुबईत पोहचला, हे आहे व्हिडिओचे सत्य

बहरीनचा राजा रोबोट बाॅडीगार्डसह दुबईत पोहचला, हे आहे व्हिडिओचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

बहरीनचा राजा रोबोट बाॅडीगार्डसह दुबईत पोहचल्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. पोस्टमध्ये दावा करण्यात येत आहे की, बहरीनचा राजा कॅमेरा आणि अंगभूत पिस्तुले असलेल्या रोबोट बॉडीगार्डसह दुबईत पोहोचला. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. आम्हाला हा व्हिडिओ Likee या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर आढळून आला.

Fact Check / Verification

आम्ही याबाबत पडताळणी करण्याचे ठरविले असता आम्हाला याच दाव्याच्या अनेक पोस्ट आढळून आल्या.

संग्रहित

हाच दावा ट्विटरवर देखील आढळून आला. या ट्विटमध्ये देखील हाच दावा करण्यात आला आहे.

संग्रहित

या ट्विटच्या रिप्लायमध्ये एक ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की, या व्हिडिओत बहरीनचे किंग नाहीत मागील वर्षी एक सुरक्षा प्रदर्शनादरम्यान हा रोबोट दाखविण्यात आला होता. रोबोटच्या खांद्यावर यूएईचा ध्वज पण पाहू शकता. व्हिडिओ बारकाईने पाहिल्यास रोबोटच्या खांद्यावर आणि हातावर यूएईचा ध्वज दिसून येतो.

याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला Khaleej Times च्या 19 फेब्रुवारी 2019 च्या एका रिपोर्टमध्ये या रोबोटविषयी माहिती मिळाली. यात म्हटले आहे की, 8 फुट उंचीच्या टायटन नावाच्या रोबोटने या प्रदर्शनात यूएईमधील लोकांना अभिवादन केले. यूएईची राजधानी अबुधाबीत सुरु असलेल्या प्रदर्शनात टायटनचे अभिवादन लोक आश्चर्यचकित झाले. मिलिट्रीचा बनियन घातलेला टायटन इंग्रजी आणि अरबीमध्ये आपला परिचय देतो. या चालत्या फिरत्या रोबोटचे वजन 60 किलो आहे. ब्रिटिश कंरनी सायबरस्टीन ने जगातील पहिला कमर्शियल इंटरटेन्मेंट रोबोट कलाकार तयार केला आहे, अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

मागील वर्षी दुबईतील एका यूट्यूब चॅनलवर देखील या रोबोटचा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.

https://www.youtube.com/watch?v=L2bzTxny0XM

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, दुबईमध्ये 2019 मध्ये सुरक्षा प्रदर्शनात हा रोबोट दाखविण्यात आला होता. त्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Result : Misleading

Our Sources

Khaleej times- https://twitter.com/khaleejtimes/status/1097485534912540672

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular