Monday, June 17, 2024
Monday, June 17, 2024

HomeFact CheckViralWeekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या...

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

वेगवेगळ्या विषयांवर चुकीची माहिती पसरविणाऱ्या दाव्यान्नी मागील आठवड्यातही सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. पॅरासिटोमॉल च्या गोळीत घातक माचुपो व्हायरस असल्याचा दावा करण्यात आला. ₹2000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी विशिष्ट फॉर्म भरावाच लागेल असा दावा झाला. महाराष्ट्रात मुस्लिम महिलेने श्रीरामाच्या पोस्टरची विटंबना केली असा एक दावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीवेळी सिडनी येथील ऑपेरा हाऊसवर तिरंगा झळकला असे सांगून एक फोटो व्हायरल करण्यात आला. कोल्हापूर येथे संशयास्पदरित्या सापडलेली मुले रोहिंग्या असल्याचा दावा करण्यात आला. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमार यांनी टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन घेतले असा दावा करण्यात आला. या आणि इतर दाव्याचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये पाहता येतील.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

डी. के. नी शपथ घेण्यापूर्वी घेतले टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन?

कर्नाटकाच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी डी. के. शिवकुमार यांनी टिपू सुलतानच्या समाधीचे दर्शन घेतले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

संभाजीनगरात पोस्टर फाडणारी ती महिला मुस्लिम?

छत्रपती संभाजी नगरमध्ये धार्मिक पोस्टर्सची विटंबना करणारी महिला मुस्लिम आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे दिसून आले.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

कोल्हापुरात सापडलेली मुले रोहिंग्या नाहीत

महाराष्ट्रातील कोल्हापुरात एका ट्रकमधून ६३ मुले पकडण्यात आली असून ही मुले रोहिंग्या आहेत, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

पॅरासिटोमॉल मध्ये माचुपो व्हायरस आहे?

P-500 पॅरासिटामॉल गोळ्यांमध्ये माचुपो विषाणू असतो, ज्याने मृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

₹2000 च्या नोटा बँकेत भरण्यासाठी विशिष्ट फॉर्मची गरज आहे?

तुम्हाला ₹2000 रुपयांच्या नोटा बदलून घ्यायच्या असल्यास विशिष्ट फॉर्म भरावा लागेल, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Weekly Wrap: पॅरासिटोमॉलची घातक गोळी, ₹2000 च्या नोटांसाठी सक्तीचा फॉर्म, कोल्हापुरात रोहिंग्या मुले यासह इतर प्रमुख फॅक्टचेक

भारतीय तिरंग्याने उजळलेल्या सिडनी ऑपेरा हाऊसचा फोटो जुना

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या निमित्ताने सिडनी ऑपेरा हाऊसचा फोटो भारतीय तिरंग्याने उजळला, असा दावा व्हायरल झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular