Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात एक सार्वजनिक रस्त्यावर फटाक्यांच्या लांबलचक माळा अतंरण्यात आलेल्या दिसत आहेत. तिथे शेकडो लोक जमले आहेत हे फटाके फुटल्यानतर अनेक लोक ते दृश्य मोबाईलमध्ये, कॅमे-यात कैद करताना दिसत आहेत. दावा करण्यात येत आहे की,भारतीय हिंदूंनी अमेरिकेत दिवाळीनिमित्त फटाके फोडले याचा हा व्हिडिओ आहे. पण हे दावा चुकीचा आहे. व्हायरल व्हिडिओ अमेरिकेतील नाही. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
सोशल मीडियात शिवसेनेने टिपू सुलतानच्या जयंतीनिमित्त संपूर्ण हिरव्या रंगाचे पोस्टर छापले असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. यात म्हटले आहे की, शिवसेना आता टिपू सुलतानचा जयंतीही साजरा करणार आहे. यासंदर्भात लावण्यात आलेल्या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी परिधान केलेल्या केसरी रंगाच्या शालीचा रंगही हिरवा दाखवण्यात आला आहे. पण हे सत्य नाही. फॅक्ट चेकंग इथे वाचा.
टाटा ग्रुपने एअर इंडिया ताब्यात घेतल्यानंतर भारतातून कॅनडाला जाणाऱ्या पहिल्या फ्लाइटमध्ये भांगडा करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की एअर इंडियाने 2018 मध्ये अमृतसर आणि बर्मिंघमफ्लाईटमधील भांगडाचा व्हिडिओ आहे. फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
तैवानमध्ये दिवाळीनिमित्त 101 मजली इमारतीवर आतिशबाजी करण्यात आल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. व्हायरल पोस्टमध्ये म्हटले आहे की, अतिशय सुंदर आतिशबाजी चे नियोजन आहे तैवान देशाचे ते पण दिवाळीत. कमाल आहे. पण ही आतिशबाजी दिवाळीची नव्हती तर नववर्षाची होती. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
सोशल मीडियावर एका तरुणीचा फोटो व्हायरल झाला आहे. यात तरुणी हाॅस्पिटलमधील बेड पडली असून तिच्यावर उपचार चालू असल्याचे दिसते. दावा करण्यात आला हा फोटो माॅडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेचा आहे. मॉडेल आणि अभिनेत्री पूनम पांडेला पती सॅम अहमद बॉम्बे याने बेदम मारहाण झाल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे असेही पोस्टमध्ये म्हटले आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
July 5, 2025
Prasad S Prabhu
June 21, 2025
Prasad S Prabhu
June 14, 2025