Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सोशल मीडिया हे एक व्यासपीठ आहे, जिथे प्रत्येक छोट्या किंवा मोठ्या घटनेबाबत अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया दिसतात. या आठवड्यात देखील, युजर्सनी अनेक बातम्यांबाबत वेगवेगळे दावे शेअर केले, ज्यामध्ये अनेक दावे दिशाभूल करणारे किंवा खोटे होते. आमच्या टीमने अशा अनेक फेक दाव्यांची वस्तुस्थिती तपासली आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी दलवीर भंडारी यांची निवड झाली आहे?
सोशल मीडियात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे सदस्य दलवीर भंडारी यांची एक बातमी व्हायरल होत आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आल्याचा दावा केला जात आहे.या पदासाठी मतदान झाले तेव्हा दलवीर भंडारी यांना 193 पैकी 183 मते मिळाली असा दावा व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आला आहे. पण हे खरे नाही. याचे फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
पंतप्रधान मोदींनी भाषणात स्वत:ला एक मोठा लुटारू म्हटले आहे?
सोशल मीडिया युजर्सकडून दावा केला जात आहे की, पंतप्रधान मोदींनी त्यांच्या भाषणात स्वत:ला एक मोठा लुटारू म्हणून संबोधले आहे.व्हायरल क्लिपमध्ये पंतप्रधान मोदींनी, “जर माझ्या आईने मला त्या दिवशी थांबवले असते, तर आज मी एवढा मोठा लुटारू झालो नसतो” असे म्हटल्याचे दिसते. पण ही क्लिप अर्धवट व्हायरल झाली आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आयएएस आरती डोगरांच्या पाया पडले?
भाजपच्या प्रवक्त्या शायना एनसी यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो शेअर केला आहे, कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या उद्घाटनानिमित्त पंतप्रधान मोदी आयएएस आरती डोगरा यांच्या पाया पडले तसेच आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतला. दाव्यानुसार, आरती डोगरा या काशी विश्वनाथ कॉरिडॉरच्या मुख्य वास्तुविशारद आहेत. पण हा दावा चुकीचा आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे?
मुंबईतील राणीच्या बागेचे नाव बदलून ‘हजरत हाजी पीर बाबा राणी बाग’ असे करण्यात आले आहे असल्याचा दावा व्हायरल झाला आहे. राणीची बाग या नावानं वीरमाता जिजाबाई भोसले व उद्यान प्राणीसंग्रहालयाला ओळखले जाते पण आता याचे नाव बदलण्यात आल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे. पण हा दावा खरा नाही. याचे संपूर्ण फऑॅक्ट चेकिंग इथे वाचा.
अभिनेता आमिर खानच्या तिसर्या लग्नाची चर्चा, व्हायरल फोटोचे हे आहे सत्य
बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि फातिमा शेख यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आमिर खानने तिसरे लग्न केल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोमध्ये आमिरसोबत दंगल चित्रपटात काम करणारी फातिमा साडी नेसलेली दिसत आहे आणि तिच्या भांगात कुंकू देखील दिसत आहे. पण हा फोटो एडिट केलेला आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.