या सप्ताहात Newschecker ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. प्रवचनकार जया किशोरी यांनी ख्रिसमला सांताक्लाॅजचा वेश परिधान केल्याचा फोटो व्हायरल झाला. याशिवाय भारतात 31 डिसेंबर 2020 आधीच कोरोना लसीच्या आपतकालीन वापराला मान्यता मिळाल्याचा दावा देखील व्हायरल झाला. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.

प्रवचनकार जया किशोरी यांनी सांताक्लाॅजचा वेश परिधान केल्याचा फोटो व्हायरल
ख्रिसमस दिवशी प्रसिद्ध प्रवचनकार जया किशोरी यांनी सांताक्लाॅजचा वेश परिधान केल्याचा फोटो व्हायरल झाला असून त्यांच्यावर टिकेची झोड उठली आहे. व्हायरल पोस्टमध्ये जया किशोरी यांचे सांता क्लोजची टोपी घातलेले दोन फोटो शेअर होत असून यात म्हटले आहे की, “या प्रवचनकार जया किशोरी आहेत, ज्या ख्रिसमसला सातांक्लोजच्या गेटअपमध्ये सजल्या आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

हिंदुंना शिव्या देणा-या एनसीपीच्या अरबाज खानच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्याचा दावा
जमावाने काही गाड्याचीं तोडफोड केली आहे शिवाय एका व्यक्तिला बेदम मारहाण करण्यात येत आहे असे या व्हिडिओत दिसते. दावा करण्यात येत आहे की काही दिवसांपूर्वी हिंदूंविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणा-या नागपुरातील राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्याक विभागाचा शहर कार्यकारी अध्यक्ष अरबाज खानला नागपुरातील जनतेने असा हिसका दाखवला आहे. हे सत्य नाही. संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

मायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी व्हायरल
मायक्रोसाॅफ्टने सोनी कंपनी विकत घेतल्याची बातमी दैनिक सुराज्य आणि दैनिक एकमत या वृत्तपत्रांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे. यात म्हटले आहे की, सरत्या वर्षाच्या अखेरीस एका नावाजलेली कंपनीचा मोठा आर्थिक सौदा झाल्याचे वृत्त आहे. पडताळणीत हा दावा खोटा असल्याचे आढळून आले आहे. स्पॅनिश वेबसाईटने पसरवलेली ही एक अफवा असल्याचे सत्य समोर आले आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.

भारतात कोरोनावरील लसीच्या वापरास 31 डिसेंबर आधीच मंजुरी मिळालेली नाही
भारतात कोरोनावरील लसीच्या वापरास 31 डिसेंबर 2020 आधीच मंजुरी मिळाली असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म शेअरचॅटवर ही बातमी खूप व्हायरल होत आहे. यात म्हटले आहे की, अखेर भारताही कोरोनावरील लशीला मंजुरी मिळाली आहे. पण अर्धसत्य आहे. 1 जानेवारी 2021 रोजी मंजुरी मिळाली आहे. याचे संपूर्ण पॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.