Authors
मागील आठवड्यातही अनेक दावे व्हायरल झाले. तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला असून मुलांच्या अवयवांचा व्यापार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असा दावा करण्यात आला. अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले, असा दावा झाला. नाशिकमधील डॉक्टर कैलाश राठी यांच्यावर मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला, असा दावा झाला. लिंकवर क्लिक करा आणि भारतीय पोस्ट सबसिडी योजनेचा लाभ घ्या, असा दावा झाला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला?
तामिळनाडूत लहान मुलांच्या मृतदेहांनी भरलेला कंटेनर सापडला असून मुलांच्या अवयवांचा व्यापार करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले?
अमित शहा यांना बेड्या घातलेले पोस्टर्स संसदेत दाखविण्यात आले, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
नाशिकमधील डॉक्टरवर मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला नाही
नाशिकमधील डॉक्टर कैलाश राठी यांच्यावर मुस्लिम व्यक्तीने हल्ला केला, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय पोस्टाची सबसिडी योजना नाही
लिंकवर क्लिक करा आणि भारतीय पोस्ट सबसिडी योजनेचा लाभ घ्या, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा