Authors
गेल्या आठवड्यातही सोशल मीडियावर व्हायरल दाव्यानी धुमाकूळ घातला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल पुरस्काराचे प्रमुख दावेदार ठरले आहेत असा दावा नोबेल निवड समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी केल्याची पोस्ट व्हायरल झाली. सरकारी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला कारण सरकारने जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे असा दावा करण्यात आला. ३१ मार्च पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास १० हजार रुपये दंड भरावा लागणार या दाव्याच्या बरोबरीनेच आता पॅन आणि आधार लिंक करण्याची तारीख ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे. असा दावा करण्यात आला. बिअर पिल्याने अनेक आजारांपासून मुक्ती मिळते असा एक दावा व्हायरल झाला. या आणि इतर दाव्याचे फॅक्ट चेक आपण या रिपोर्ट मध्ये पाहणार आहोत.
पॅन-आधार लिंकिंग न केल्यास १० हजाराचा दंड?
३१ मार्च २०२३ पर्यंत पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास १० हजार रुपयांचा दंड भरावा लागेल असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
मोदी नोबेलचे दावेदार असे अस्ले तोजे म्हणाले नाहीत
नोबेल पुरस्कार निवड समितीचे उपनेते अस्ले तोजे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोबेल शांतता पुरस्काराचे प्रमुख दावेदार आहेत असे म्हटल्याचा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघड झाले.
जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन मिळाले?
महाराष्ट्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना सुरु करण्याचे आश्वासन दिले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
पॅन-आधार लिंकची मुदत वाढविली नाही
पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत आता ३१ मार्च २०२४ पर्यंत वाढविण्यात आली आहे, असा दावा करण्यात आला. मात्र हा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे आमच्या तपासात उघड झाले.
बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत?
बियर पिण्याने हृदय चांगले राहते, हाडे घट्ट होतात आणि चेहऱ्याला चमक येते असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा चुकीचे संदर्भ देऊन करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in