Thursday, September 23, 2021
Thursday, September 23, 2021
घरFact Checksमोबाईलवर अतिप्रमाणात गेम खेळल्याने डोळ्यांत पैरासाईट नावाचा किडा तयार होतो? हे आहे...

मोबाईलवर अतिप्रमाणात गेम खेळल्याने डोळ्यांत पैरासाईट नावाचा किडा तयार होतो? हे आहे सत्य

मोबाईलवर अतिप्रमाणात गेम खेळल्याने डोळ्यांत पैरासाईट नावाचा किडा तयार होतो असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत डोळ्यातून एक जंतू बाहेर काढला जात असल्याचे दिसत आहे. व्हायरल दाव्यात म्हटले आहे की, “खुपवेळ मोबाईल फोनवर गेम खेळल्यामुळं डोळ्यामध्ये पैरासाईट नावाचा किडा तयार होतो, त्याला ऑपरेशन करून काढताना बघा?. कृपया हे सर्व ग्रुपवर पाठवा.हे आपल्या मुलांना दाखवा त्यांना समजवा”

आमच्या अनेक वाचकांनी हा व्हिडिओ आम्हाल पाठवला असून याबबात पडताळणी करण्यास सांगितले आहे.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

व्हायरल व्हिडिओचे नेमके काय सत्य आहे याची पडताळणी करण्यास सुरुवात केली.व्हिडिओतील काही स्क्रीनशाॅट्स काढून रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता आम्हाला India Video नावाच्या युट्यूब चॅनलवर हा व्हिडिओ ज्यात म्हटले आहे की, मानवी डोळ्यातील 20 सेमी लांब किडा, व्हिडिओत प्रथम रेकॉर्ड करण्यात आला.

हा व्हिडिओ 2013 सालचा असून एका रुग्णाच्या डोळ्यांतून 20 सेमी लांब जंतू बाहेर काढण्यात आला होता. हा जंतू खासकरुन पश्चिम अफ्रिकेत आढळून येतो. ‘लोआ लोआ’ या नावाने ओळखला जातो. मँग्रुव्ह नावाच्या माशीने डंख मारल्याने लोआ लोआ नावाचा जंतू डोळ्यात तयार होतो असे इंडिया व्हिडिओच्या वेबसाईटवर माहिती देण्यात आली आहे.

आम्ही याविषयी अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला असता आम्हाला cdc या वेबसाईटवर ही माहिती आढळून आली. लोयासिस, ज्याला बहुतेक लोक आफ्रिकन नेत्र किडा म्हणतात परजीवी अळी लोआ लोआमुळे होतो. हे क्रायसॉप्स वंशाच्या हरणांच्या माशांच्या (आंब्याच्या माशी किंवा खारफुटीच्या माश्या म्हणूनही ओळखले जाते) वारंवार चावण्याद्वारे होते. असे यात म्हटलेले आहे.

याशिवाय आम्हाला Dr. Ashley Mulamoottil यांनी 18 एप्रिल 2013 रोजी शेअर केलेला हा व्हिडिओ देखील फेसबुकवर आढळून आला.

Conclusion

आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की, व्हायरल व्हिडिओ मोबाईलवर अतिप्रमाणात गेम खेळल्यामुळे डोळ्यात तयार झालेला अळीचा नसून लोआ लोआ नावाच्या परजीवी आळीचा आहे. ही अळी पश्चिम व मध्य अफ्रिकेत आढळते.

Result-Misleading

Our Sources

इंडिया व्हिडिओ- https://www.indiavideo.org/health/loa-loa-worm-removing-surgery-8857.php


कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular